‘भाईजान’ सलमानचा 21 वर्षांपूर्वी आलेला ‘हा’ सुपरहिट सिनेमा रामायणवरून प्रेरीत होता !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमध्ये असा एक सिनेमा आहे जो रामयणावर आधारीत असून त्यात मॉडर्न रामायण दाखवण्यात आलं आहे. 1999 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाचं नाव आहे हम साथ साथ है. यात राम होता मोहनीश बहल, लक्ष्मण बनला होता सलमान खान आणि भरत होता सैफ अली खान. या सिनेमात सीतेच्या भूमिकेत होती अभिनेत्री तब्बू. सोनाली बेंद्रे ही उर्मिलेच्या भूमिकेत आहे. करिश्मा कपूरचा रोल रामायणमधील मांडवीवर आधारीत होता.

सिनेमाची मूळ कहाणी रामायणावरूनच प्रेरीत होती परंतु त्यात आजच्या जमान्यानुसार फेरबदल करण्यात आले होते. अलोक नाथ राजा दशरथवरून प्रेरीत होते. रीमा लागू कैकयी होती. या सिनेमात तीन मंथरा होत्या. कल्पना अय्यर, जयश्री टी आणि कुनिका. कौटुंबिक सिनेमा बनवणाऱ्या राजश्री प्रॉडक्शननं हा सिनेमा तयार केला होता. हा सिनेमा सूरज बडजात्यानं डायरेक्ट केला होता. जरी हे रामायण असलं तरी यात कोणता रावण नव्हता.

राजश्रीनं तिची परंपरा कायम ठेवत रावणाशिवाय याला कौटुंबिक टच दिला होता. रामाच्या वनवासानंतर कैकयीला पश्चाताप आणि नंतर सर्व कुटुंब एक होणं ही सिनेमाची स्टोरी होती. हा सिनेमा सलमान खानसाठी खूप मुश्किल होता. कारण या शुटींग दरम्यानच राजस्थानमध्ये तो काळवीटाच्या बेकायदेशीर शिकारीच्या प्रकरणात असा अडकला होता की, दीर्घकाळ यावरून वाद सुरू होता.