Video : पहाटे 5 वाजता उठल्यानंतर कसा होतो हुमा कुरेशीचा योगा सेशन, फोटो सांगतोय खरी परिस्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  हुमा कुरेशी सध्या स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात तिच्या आगामी ‘बेल बॉटम’ चित्रपटाची तयारी करत आहे. येथे ती तिच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेत आहे. दरम्यान तिने सकाळी ५ वाजता योग सेशनमधील स्वतःचा एक गमतीशीर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हीही तुमचे हसू थांबवू शकणार नाही.

फोटोत हुमाचा विस्कटलेला हेअर बन दिसू शकतो. तिचे केस आणि परिस्थिती दाखवत हुमा मजेदार फेसही करत आहे. तिने लिहिले- ‘५ वाजताच्या योगामध्ये मी असे काहीतरी #yogini’. हुमाची शैली मजेदार आहे. यापूर्वीही हुमाने ग्लासगोमधून सकाळी ७ वाजताच्या योग सत्रातील तिचा फोटो शेअर केला होता. अशाच प्रकारे ती आपल्या विनोदी मजेदार पद्धतीने फिटनेस कायम राखण्यासाठी लोकांना प्रेरित करत आहे.

लॉकडाऊनमध्ये हुमाने ४० दिवसात बदलला आपला लूक

लॉकडाऊन दरम्यान हुमाने बरेच वर्कआऊट केले होते. तिने मसल्स फ्लॉन्ट करतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. हुमा कुरेशीने सांगितले होते की, तिने ४० दिवसांत हे फिट बॉडी केले आहे. या ४० दिवसात ती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, फिट आणि फास्ट झाली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये हुमाचा बदललेला लूक दिसत आहे.

हुमा मागच्या वेळी ‘लीला’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. यानंतर ती ‘घुमकेतू’मध्ये कॅमिओ भूमिकेत दिसली. आता ती लवकरच ‘बेल बॉटम’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात हुमा, अक्षय व्यतिरिक्त वाणी कपूर आणि लारा दत्तादेखील आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like