Huma Qureshi | हुमा कुरेशीचा नवीन लूक व्हायरल; बॉसी लूकमध्ये ग्लॅमरची भर टाकत केले चाहत्यांना घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) नुकतीच तिच्या ‘डबल एक्सेल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या अभिनयांबरोबरच तिच्या ग्लॅमरस लूकने हुमा चाहत्यांवर भुरळ पाडत असते. हुमा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनेत्रीने नुकताच तिच्या बॉसी लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. हुमाने (Huma Qureshi) आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. हुमा नेहमीच विविध भूमिका उत्तमरित्या साकारत असते.
हुमाने नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि ब्युटीफूल दिसत आहे. तिच्या या स्टायलिश लुकमुळे चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. हुमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी तिने ब्लॅक शॉर्ट ड्रेससोबत मॅचिंग ओव्हरकोट आणि मॅचिंग स्टॉकिंग्ज घातले आहेत. यावेळी तिने काळ्या रंगाची हिल्स देखील कॅरी केली आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की अभिनेत्रीने तिचा पूर्ण लुक काळ्या रंगाचा केला आहे. तिने काळ्या रंगाची इयरिंग आणि हातात अंगठी देखील घातली आहे. या स्टाईलला साजेल असे न्यूड मेकअप करत हुमाने केसांना सॉफ्ट वेलवी टच देऊन केस मोकळे सोडले आहेत. सध्या उमाच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
हुमाने (Huma Qureshi) या लुक मध्ये कॅमेरासमोर तिची बॉडी खूपच फ्लॅट केली आहे. तर या फोटोमध्ये हुमा खूपच स्वॅगमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये हुमाने एका पेक्षा एक पोजेस देत सर्वांनाच थक्क केले आहे. हुमाला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. हुमाने आजवर तिच्या कारकीर्दीत प्रत्येक भूमिकेत स्वतःला सामावून घेतले आहे. आतापर्यंत तिने विविध भूमिका साकारून आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
Web Title :- Huma Qureshi | bollywood huma qureshi photos in bossy look see her photos here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
U19 Womens World Cup | सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…