स्पर्मपेक्षा कितीतरी पट जास्त किमती, जाणून घ्या – महिलांच्या एग्ज बाबत ‘या’ 8 रंजक गोष्टी
नवी दिल्ली : वृत्त संस्था – महिलांच्या शरीरात तयार होणार्या एग्ज (human eggs) बाबत लोकांना खुप कमी माहिती असते. अमेरिकेच्या मेडिकल रायटर रँडी हटर एपस्टीन यांनी आपले पुस्तक ’गेट मी आऊट’मध्ये एग्ज आणि प्रेग्नंसीशी संबंधीत खुप रंजक माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी एग्ज (human eggs) रिलीज होण्यापासून, स्पर्मसोबत ताळमेळ आणि भ्रूण बनवण्यात त्याच्या भूमिकेबाबत सांगितले आहे. याबाबत जाणून घेवूयात…
1 एग्ज लवकर तयार होतात –
बेबी गर्लच्या शरीरात नऊ आठवड्यानंतरच एग्ज बनणे सुरू होते. पण हे एग नऊ आठवड्यानंतर नाही तर गर्भधारणेच्या 9 आठवड्यानंतरच तयार होऊ लागतात. या काळापर्यंत भ्रूण 5 महिन्याचे होते. बाळाच्या जन्माच्या वेळेपर्यंत या अपरिपक्व अंडाणुंपैकी बहुतांश मरतात. ही एकदम सामान्य स्थिती आहे. आकाराबाबत बोलायचे तर याची जाडी एका केसाएवढी असते. शरीरातील कोणतीही पेशी इतकी मोठी नसते.
2 एग्ज महाग असतात –
सरासरी, महिला आपल्या जीवनकाळात केवळ 400 ते 500 अंडी ओव्यूलेट करतात. ती स्पर्मच्या तुलनेत खुप कमी आहेत. प्रत्यक्षात, पुरुषांच्या एकावेळच्या इजॅक्युलेशनमध्ये जेवढ्या स्पर्म सेल्स निघतात, तेवढे एग्ज महिलांच्या शरीरात तयार होण्यास संपूर्ण जीवन लागते. कदाचित याच कारणामुळे एग्जची किंमत स्पर्मपेक्षा कितीतरी जास्त असते. एग डोनर केवळ एका एगचे लाखो रूपये कमावू शकतो. तर स्पर्म डोनरला प्रत्येक इजॅक्युलेशनसाठी खुप कमी पैसे मिळतात.
3 एग्ज हळुहळु मोठे होतात –
शरीराच्या इतर पेशींच्या उलट अंड्याच्या पेशींना मोठे होण्यात अनेक वर्ष लागतात. ते अनेक वर्षापर्यंत ओव्हरीच्या आत अपरिपक्व आवस्थेत राहतात आणि ओव्यूलेशनच्या प्रक्रियेदरम्यान परिपक्व होतात.
4 अंडी नाजूक असतात –
महिलांच्या शरीरात तयार होणारी एग्ज खुप नाजुक असतात. त्यांना फ्रीज करण्यासाठी व्हिट्रिफिकेशन नावाच्या एका तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाने एग्जच्या बाहेरील थराला मजबूत केले जाते. यासाठी ती काचेच्या कंटेनरमध्ये बंद केली जातात.
–
5 वयासोबत एग्जची क्षमता कमी होते –
एका तरूण महिलेच्या शरीरात अनेक हेल्दी एग्ज असतात.
21 वर्षाच्या महिलेची सुमारे 90 टक्के अंडी सक्षम असतात.
तर, एका 41 वर्षाच्या महिलेची जवळपास 10 टक्के अंडीच फर्टिलाइज होण्याच्या क्षमतेची असतात.
याच कारणामुळे योग्य पार्टनर मिळेपर्यंत अनेक महिला आपली एग्ज काढून फ्रीज करतात.
6 स्पर्म निवडण्याचा विशेष अधिकार –
लाखो स्पर्म एग्ज मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु एग्जमध्ये स्पर्म निवडण्याची एक विशेष क्षमता असते. या हिशेबाने जर एक स्पर्म एका एका एगमध्ये गेला तर दुसरा स्पर्म नंतर आत जाऊ शकत नाही. अंड्यात एक विशेष ’ऑर्गेनेल’ असते जे प्रोटीन आणि एंजाइम काढतात जेणेकरून दुसरा स्पर्म आत जाऊ नये.
7 एग्जमध्ये प्रेग्नंसीची सर्व क्षमता –
खुप अगोदर असा समज होता की, स्पर्ममुळेच प्रेगन्सी शक्य आहे. आता सर्वांना समजले आहे की, यामध्ये एग्जची भूमिका महत्वाची असते. एग्ज होणार्या बाळाला अर्धे जीन्स देतात, याशिवाय यामध्ये स्पर्म-एग्जला जोडण्याची सुद्धा क्षमता असते. एगचा डीएनए त्याच्या केंद्रात लटकत असतो, जो एका तंतुच्या माध्यमातून स्थित असतो.
8 एग्ज डोनेट करणे सोपे नाही –
स्पर्म डोनेशन खुप सोपे आहे, परंतु एग डोनेशनमध्ये खुपच गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागते. एग्ज डोनरला सर्वप्रथम हार्मोन इंजेक्शन दिले जाते जे अंडाशयाला हायपरस्टिम्युलेट करते जेणेकरून तो एक नव्हे तर अनेक अंडी बनवू शकतो. जेव्हा एग्ज रिलीज होण्याची वेळ येते तेव्हा डॉक्टर्स बर्थ कॅनलमध्ये कॅथेटर टाकतात जेणेकरून फ्लूइडद्वारे एग्ज काढता येऊ शकतील.
Ahmednagar News | …म्हणून 70 वर्षांच्या आजींनी थोपटली भाजप खासदार डॉ. सुजय विखेंची पाठ