चीनी शरीरसौष्ठवपट्टू डॉक्टर युवती लढणार ‘कोरोना’ व्हायरसशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या टीव्ही मालिकेतील, व्हीडिओमधील, सिनेमामधील गाजलेल्या भूमिकेसारखी हुबेहूब वेशभूषा करणे या प्रकाराला कॉसप्लेअर असे म्हणतात. शरीरसौष्ठवपटू आणि अशी कॉसप्लेअर असलेली लोकप्रिय चिनी डॉक्टर युवती आता कोरोना व्हायरसपासून आपल्या देशवासीयांना वाचविण्यासाठी पुढे आली आहे.

युआन हेराँग असे या डॉक्टर युवतीचे नाव असून ती शांडोंग प्रांतातील आहे. एक अत्यंत यशस्वी शरीरसौष्ठवपटू म्हणून ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. तसेच व्हीडिओ गेममधील चुन ली या प्रसिद्ध पात्राची ती कॉसप्लेअर म्हणून सर्वत्र ओळखली जाते. आपण कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात पुढे येणाचे कारण सांगताना युआन म्हणते की मी स्वत: एक डॉक्टर आहे. अशा वेळी मी सर्वांच्या पुढेच असणे अपेक्षित आहे. साधारणत: न्यूमोनियाचे 171 रुग्ण बरे झाले आणि 15238 संशयित सापडले असे सांगून युआन म्हणाली की, पारंपरिक चीनी वैद्यकीय उपायांचीही यावेळी मदत घेण्यात आली.

https://www.instagram.com/p/B7-IlwhJdqH/?utm_source=ig_web_copy_link

कोरोना व्हायरसला प्रतिबंध आणि उपचार या आघाड्यांवर आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असेही युआन एका ट्वीटद्वारे सांगते. कोरोना व्हायरस मलाच होऊ नये म्हणून मी वैयक्तिक फिटनेसला अत्यंत महत्त्व देते. आपण सुदृढ दिसावे या हेतूने मी 2016 मध्ये व्यायाम सुरू केला, असेही युआन म्हणते.

https://www.instagram.com/p/B7_V2_yJR2W/?utm_source=ig_web_copy_link

साधारणत: 2019 मध्ये तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती विविध मॉडेलिंगच्या आणि शरीरसौष्ठव स्पर्धांत युआनने सहभागी होण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला मी योगसाधना सुरू केली होती. मात्र योगसाधनेमुळे मला हवे तसे शरीरसौष्ठव मिळणार नव्हते. म्हणून मग मी झांग वै या मार्गदर्शकांच्या साहाय्याने व्यायाम करू लागले. ज्या घरात डॉक्टरी परंपरा आहे, अशा कुटुंबात युआन जन्मली. तिच्या पालकांनी तिला जे व्हायचे आहे, ते बनण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले.