‘या’ कारणामुळं लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : व्हिटॅमिन डी( Vitamin D) ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणे गरजेचे आहे. पण सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. अशावेळी ज्यांच्या शरीरात व्हिटमिन डी ची कमरता नाही, ते लोक कोरोना व्हायरसपासून अधिक सुरक्षित आहेत. नुकत्याच केलेल्या एका संसोधनातून समोर आले आहे. व्हिटॅमिन डी ची कमतरता लोकांमध्ये का झाली? का या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे गंभीर आजारांचे शिकार होत आहेत? रिसर्चमधून समोर आले की, गेल्या 500 वर्षांपासून लोकांमध्ये व्हिटमिन डी ची कमतरता भासत आहे. यामागे एक अनोखे कारण समोर आले आहे.

गेल्या 500 वर्षापासून जगभरातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता कमी असण्याचे मुख्य कारण मानवी स्थलांतर म्हणजे मायग्रेशन हे आहे. तुम्ही म्हणाल असे कसे ? तर थोडेसे गरम व्हायला लागलं की, लोक एसी लावतात थंड ठिकाणी जाऊन राहतात. देशातील उष्ण परिसर सोडून थंड ठिकाणी जाऊन लोक राहतात. याच स्थलांतरामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता भासत आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोरोना व्हायरस, हृदयासंबंधी आजार, डायबिटीस, तणाव आणि काही प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. त्यामुळे थंड प्रदेशात राहणारे लोक ही कमतरता पूर्ण करण्यासाठी समुद्र किनारी जाऊन सनबाथ घेतात.

यूनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न डेनमार्क आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगनच्या संशोधकांनी एकत्र रिसर्च करून हे जाणून घेतले की, गेल्या 500 वर्षात लोक दक्षिण भागातून उत्तरेकडे आले आहेत. हे जगभरात झाले आहे. ज्या भागात अल्ट्रावायलेट किरणांचा प्रभाव जास्त आहे, ते भाग सोडून लोक कमी किरणांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये रोजगार शोधण्यासाठी आले. त्यामुळे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाली आहे.दरम्यान जेंव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात जाता तेंव्हाच तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी निर्माण होतात. त्यामुळे सूर्यप्रकाशात राहणे गरजेचे आहे. लोक अनेक महिने एसी, घर, ऑफिसात काम करतात. ते उन्हात कधीच जात नाही. म्हणून त्यांना व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते.

हा रिसर्च अशा लोकांवर केंद्रीत होता जे सूर्यप्रकाश जास्त असलेले भाग सोडून कमी सूर्यप्रकाशाच्या भागात गेले. या रिसर्चचा कालावधी 500 वर्षे होता.याचे एक उदाहरण देण्यात आले आहे की, 20 व्या शतकात आफ्रिकन-अमेरिकन लोक अमेरिकेच्या दक्षिण भागातून उत्तर भागात गेले. रोजगार आणि जीवन स्तर सुधारणे हे यामागचं कारण होतं. सोबत रंगभेदामुळे सुरू असलेली गरिबी दूर करणे. पण लोकांनी या भागात शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांवर लक्ष दिले नाही.