गुप्तधनासाठी दिला जाणार होता चिमुकलीचा बळी पण…

औरंगाबाद : पाेलीसनामा ऑनलाईन

आज देश कितीही प्रगती करीत असला तरी अंधश्रद्धेची पाळंमूळ अजूनही किती खोलवर रुजलेली आहेत याची प्रचिती औरंगाबाद येथील एका घटनेमुळे समोर आली आहे. औरंगाबाद येथे चक्क गुप्तधनासाठी एका मुलीचा बळी देण्यात येत होता मात्र ऐन वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच छापा टाकल्याने मुलीचा जीव बचावला आहे.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8b59807-a7a0-11e8-9d4d-ad4837d6c922′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यातील रांजणगावमध्ये एका चिमुकलीचा बळी दिला जाणार होता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच छापा टाकल्याने मुलीचा जीव बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंधश्रद्धेतून मुलीचा बळी देण्यासाठी रांजणगावात सर्व तयारी करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि वडोदबाजार पोलिसांनी अचानक छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. इमाम पठाण आणि बाळू शिंदे अशी यातील दोन आरोपींची नावं आहेत.

ही पूजा करण्यासाठी एकाला १ लाख ६८ हजार रुपये देण्यात येणार होते, अशी माहितीही समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी नग्न पूजा आणि बालिकेचा बळी दिला जाणार होता. मात्र, अंनिस आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे.