#HumanStory : पॉकेटमनीसाठी ‘स्पर्म डोनेशन’ला केलं सुरू नंतर पुढं झालं असं काही, स्वतः ‘स्पर्म डोनर’नं सांगितली संपुर्ण ‘स्टोरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तु्म्ही स्पर्म डोनेशनबद्दल ऐकलंच असेल. स्पर्म डोनेशन ब्लड डोनेशनपेक्षा थोडं वेगळं आहे. फेसबुकवर प्राऊड स्पर्म डोनरचा फोटो क्वचितच पहायला मिळेल. अनेक प्रकारची भीती त्यांचा पाठलाग करत असते. सतत काय चालू असतं एका स्पर्म डोनरच्या डोक्यात? हेच सांगणारी ही गोष्ट….

“आतापर्यंत मी १०० हून अधिकवेळा स्पर्म डोनेट केलं आहे. आधी डायरीत दिवस आणि वेळ लिहायचो. परंतु आता हिशोबच नाही. पॉकेटमनी साठी याची सुरुवात केली होती. विचार केला तर जरा विचित्रच वाटतं. यावेळी देशातील अनेक भागात माझ्या शरीराचे अनेक हिस्से रहात असतील.

२०१४ साली कॉलेजला होतो. एकदा मित्रांना आपापसात खुसुर-पुसुर करताना पाहिलं. मी गेल्यानंतर सगळे गप्प झाले. मी विचारणा केली तरी कोणी काही बोलले नाही. एका खास मित्राने नंतर सांगितले की, आम्ही स्पर्म डोनेट करायला जात आहोत. मी थोडा चकित झालो. मोबाईलवर व्हिडीओ पाहणं, चेष्टा मस्करी करणं ठिक होतं परंतु स्पर्म डोनेशन ! मी त्याला समजावून सांगत होतो आणि तो मला.

‘दोन महिन्यानंतर स्पर्म बँकमध्ये होतो. एसी रिसेप्शनवर घामाघूम झालेलो’

मी स्पर्म बँकमध्ये रिसेप्शनपाशी बसलो होतो. नंतर मला आत बोलावलं गेलं. समजावलं गेलं. मला केवळ सँपल द्यायचं होतं. तपासणी केल्यानंतर क्वालिटी चांगली असेल तरच पुढे बोललं जाणार होतं. पुढे एचआयव्ही आणि हेपेटाइटिसची टेस्ट होणार होती. यानंतर सगळं ठिक असेल तरच मला डोनरचं कार्ड मिळणार होतं. स्पर्म बँकेत हे कार्डच माझी ओळख असणार होतं.

‘आणि माझ्या हातात एक सँपल बॅग होती’

डॉक्टर(स्पर्म बँक मॅनेजर) मला समजावून सांगत होते आणि मी ऐकत होतो. बोलणं झाल्यानंतर त्यांनी खांद्यावर हलकेच थाप दिली. विश्वासात घेतलं. यात घाबरण्यासाखं काहीच नाही. मी होकारार्थी मान हलवली. मी रस्ता शोधत होतो की, काहीही करून इथून पळ काढू. ५ मिनिटांनंतर मी कलेक्शन रूममध्ये होतो. रुममध्ये हिंदी, इंग्रजी मॅगेझिन्स होत्या. अशा ज्यांना मी कधी हातही लावला नव्हता. काही फोटोही होते. मी एकटाच होतो माझ्या हातात एक रिकामी सँपल बॅग होती.

‘पुढील काही मिनिटांत माझ्या नशीबाचा निर्णय होणार होता’

मी त्या मित्राला दुषणं देऊ लागलो, ज्याने पॉकेटमनीसाठी मला हा रस्ता सुचवला होता. स्वत:लाही दोष देऊ लागलो की, मी तिथून पळ का काढला नव्हता. परंतु आता काहीच होऊ शकत नव्हतं. एक सँपल माझं भविष्य ठरवणार होतं. थोड्या वेळाने बाहेर पडलो. बॅग दिली आणि जोरात बाहेर पळून गेलो. त्यानंतर अनेक दिवस विचार करण्यातच गेले. काय होईल जर कॉलच नाही आला तर. याचा अर्थ असा तर नसेल की, मी पुढे जाऊन बाप होऊ शकणार नाही. किंवा मला काही आजार निघाला तर! बोर्ड रिजल्टची वाट पाहतानाही एवढी भीती वाटली नव्हती. पहिल्यांदा प्रेमात पडल्यानंतरही इतकी अस्वस्थता नव्हती. अखेर कॉल आला आणि मला पुढील व्हिजिटसाठी बोलावण्यात आलं.

आता सर्व भीती संपली होती. भीती एकच की, कुटुंबियांकडून हे कसं लपवू ?

पप्पा सरकारी नोकरीला होते. दिल्लीतील जामियानगर भागात कुटुंब रहात होतं. तिथेच कॉलेजमध्ये माझे खूप सारे मित्र होते. साधं शिंकलं तरी आवाज सर्वांपर्यंत पोहोचत होता. अशात स्पर्म डोनेशनसारखी गोष्ट कशी लपवणार होतो. आम्ही मित्रांनी एकी केली. मी सर्वात नवीन होतो. त्यामुळे सर्वांनी माझी मदत केली. सर्व काही दोनदा तीनदा समजावलं गेलं. कॉलेजात माझ्या गैरहजरीत सर्व काही सांभाळून घेतलं जाईल असा विश्वासही दिला गेला.

‘पहिल्यांदा कलेक्शनसाठी स्पर्म बँकेत जाताना असा तयार झालो जसा काय सिक्रेट मिशनवर आहे.’

मी वेळेत पोहोचलो. सगळ्या टेस्ट झाल्या. काही दिवसांनंतर माझ्याकडे डोनर कार्ड होतं. मी ऑन कॉल स्पर्म डोनर झालो होतो. वेळोवेळी कॉल यायचा आणि मी तिथे हजर व्हायचो. स्पर्म बँकेतील ती थंडगार रूम, त्या मॅगेझिन्स, आणि फोटोंसोबत माझी ओळख झाली होती. अनेकदा रंजक अनुभव यायचे. एकदा मी गेलो होतो तेव्हा रिसेप्शनवर एक मुलगा वाट पहात होता. खूप घामाघूम झाला होता. मला पाहताच इकडे तिकडे पाहू लागला. मी आता जुना खेळाडू झालो होतो. तरीही कोणी ओळखू नये म्हणून काळजी घ्यायचो. नंतर मला लक्षात आलं की, ओळख लपवण्याचा प्रयत्न करणारी माझ्यासारखी अनेक मुले होती.

‘ते ऐकून सुन्न झालो’

पॉकेटमनीसाठी स्पर्म डोनर बनलो होतो. हळूहळू सवय झाली. समवयस्क मित्र माझ्यासारख्या मुलांची टर उडवत असे. एकदा एक मित्र म्हणाला की, लग्न झाल्यानंतर बघा. पूर्ण जगाला मुलं देत आहेत, नंतर स्वत:लाच मूल होणार नाही. ते ऐकून मी पूर्ण दिवस सुन्न झालो होतो. इंटरनेटवर वाचण्यातच रात्र घालवली. काही दिवसांनंतर मी पुन्ही स्पर्म बँकेत होतो.

‘आता पैशांसाठी नाही, तर यासाठी काम करू लागलो’

सुरुवातीला प्रत्येक हप्त्यात जायचो. ५ दिवस खूप काळजी घ्यायला लागायची. दारू नाही, सिगारेट नाही, फिजीकल इंटिमेट नाही व्हायचं. असे केल्याने वॉल्युम कमी होतो आणि सँपल खराब येतं. जर तुम्हाला कॉल आणि तुम्ही हो म्हटलात तर ५ दिवस तुम्हाला वाट पहावीच लागणार सगळ्याच गोष्टींसाठी. आता काही रुपयांसाठी नाही, तर एका न पाहिलेल्या कपलसाठी काम करू लागलो होतो.

कॉलेज संपलं आणि…

कॉलेज संपलं नंतर बँकेत नोकरी मिळाली. एका वर्षापूर्वीच लग्न झालं. आताही मी डोनेट करत असतो. परंतु खूपच कमी. असा जातो की, बायकोला चाहूल नको लागायला. तिला कळलं तर लग्नच तुटू शकतं. भीती वाटते खूप परंतु कॉल आला तर नाही म्हणवत नाही. ५ वर्षांपूर्वी मिळालेला तो डोनर नंबर माझ्या ओळखीपेक्षाही मोठा झाला आहे. पहिल्यांदा जायचो तेव्हा सर्वात आधी डायरी लिहायचो. दिनांकही लिहायचो कारण लक्षात रहावं. नंतर नेहमीच जायला लागलो. डायरी मागे पडू लागली. आता दिल्ली सोडून सोनीपतमध्ये रहातो. डायरी कुठे आहे आठवत नाही.

‘१०० हून अधिकवेळा स्पर्म डोनेट केलं, त्यातील अर्धे जरी यशस्वी झाले असतील तर कमीत कमी ५० मुलांचा पिता असेल’

कोणाचे डोळे माझ्यासारखे असतील तर कोणाचे केस माझ्यासारखे असतील. कोणी माझ्यासारखं चालत असेल तर कोणी माझ्यासारखं शॉर्ट टेंपर्ड असेल. बँकेत जेव्हा कॉम्प्युटर समोर बसलेलो असतो तेव्हा अनेकदा त्यांचा विचार येतो. ती मुलं ज्यांना मी कधी ओळखतही नाही, जे मला कधी भेटणारही नाही.”

 

आरोग्यविषयक वृत्त –

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व

लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची ‘अशी’ घ्या काळजी

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

 

You might also like