Corona Vaccination : देशात कोरोना लसींची टंचाई असल्यानं मोदी सरकारनं घेतला हा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना प्रतिबंधक लसींची भारताला मोठ्या प्रमणात गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बुधवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या कोरोना प्रतिबंधक लसींना ब्रिटन, युरोपीय समुदायातील अन्य देश, अमेरिका, जपान यांनी मान्यता दिल्या आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत. अशा लसींच्या भारतात मानवी चाचण्या (Human testing) करण्याची आवश्यकता आता उरलेली असून मानवी चाचणीची (Human testing) अट रद्द केल्याची घोषणा देशाचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी बुधवारी केली.

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

कोणत्याही देशात कोणत्याही लसीचा वापर करायचा असले तर त्या पूर्वी त्या लसीची मानवी चाचणी घेतली जाते.
त्यानंतर या चाचण्यांतून हि लास किती परिणामकारक आहे हे तपासले जाते.
ब्रिजिंग ट्रायल्स अशीही संज्ञा असलेल्या मानवी चाचण्या आता विशिष्ट देशांनी या लसीला मान्यता दिली असेल तर भारतात बंधनकारक नाहीत.

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक व्ही या तीन लसींचा वापर देशातील लसीकरण मोहिमेत सुरू आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत संसर्गाचे प्राण अधिक होते त्यामुळे बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही जास्त होते.
त्यातच लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम झाला अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली.

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी; पुढं झालं असं काही…