Herd Immunity : AIIMS मध्ये लशीपूर्वीच आली ही चांगली बातमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस विरोधात जगभरातील अनेक संशोधक लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशात देखील कोरोना व्हायरस विरोधात लस तयार करण्यात आली आहे. देशातील पहिली स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनचे मानवी परीक्षण सुरु आहे. ज्या व्याक्तींवर हे परीक्षण केले जाते आहे, अश्यांपैकी 5 टक्के लोकांमध्ये अधीपासूनच अँटीबॉडी आढळून आल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील एम्समध्ये सुरु असलेल्या मानवी परीक्षणासाठी एकूण 80 लोकांनी उत्सुकता दाखवली आहे. या 80 पैकी 16 लोकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या आहेत.

20 टक्के स्वयंसेवकांमध्ये आढळल्या अँटीबॉडी

एम्समध्ये मानवी चाचणीसाठी 80 लोकांना तयार करण्यात आले आहे. मात्र त्यापैकी केवळ 16 लोकांची निवड करण्यात आली आहे. तर 20 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. याचा अर्थ या लोकांमध्ये अगोदरच कोरोना विषाणू होता. तर इतर लोकांना मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या आहेत, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अँटीबॉडी आढळणे म्हणजे या लोकांना कोरोनाची लागण झाली होती आणि ते बरे देखील झाले आहेत. यामुळे या लोकांवर मानवी परीक्षण करून काहीही उपयोग होऊ शकणार नाही.

हर्ड इम्युनिटीचा आणखी एक पुरावा

देशामध्ये लशीच्या मानवी चाचणी करण्यास अडचणी येत असल्या तरी मोठ्या लोकसंख्येमध्ये सार्स कोव्ह-2 चे प्रति अँटीबॉडी विकसित होत आहेत. या लोकांना दुसऱ्या कोणत्याही आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या दिसलेल्या नाहीत. एम्समध्ये देखील मानवी परीक्षणासाठी निवडलेल्या 20 लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झालेल्या आढळल्या आहेत. याचाच अर्थ देशात हर्ड इम्युनिटी विकसित होत आहे. यापूर्वी सीरो सर्व्हेमध्ये देखील 22 टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा पुरावा मिळाला आहे.

आरोग्याच्या समस्या नसलेल्या लोकांची गरज

एम्सला लसीच्या मानवी परीक्षणासाठी एकूण 100 लोकांची आवश्यकता आहे. ही लस दिल्यानंतर कमीत कमी दोन आठवडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहावे लागणार आहे. या दरम्यान त्यांच्यावर लशीचा काय परिणाम होत आहे हे समजणार आहे. यासाठी 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींची निवड केली जात आहे. मात्र, हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि फुफ्फुसांशी संबंधित कोणताही आजार असता कामा नये, तसेच अनियंत्रित मधूमेह देखील नसवा.