संशोधनामध्ये खुलासा ! तुमचं ‘मलमुत्र’ सांगणार तुम्ही किती ‘कमवता’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या क्विंसलॅड युनिव्हर्सिटीने एका शोधात दावा केली की व्यक्तीच्या मलमूत्रापासून समजू शकते की कोण व्यक्ती किती कमावतो. यासाठी युनिव्हर्सिटीच्या एका प्रयोगशाळेत काही असामान्य नमुने गोळा करण्यात आहे, हे नमुने ऑस्ट्रेलियाच्या 20 टक्के लोकसंख्येएवढ्या लोकांच्या मलमूत्राचे नमुने होते.

रिपोर्टनुसार देशभरातील मलमूत्राचे नमुने घेऊन त्यांना थंड करुन युनिवर्सिटीच्या संशोधकांना पाठवण्यात आले. हे नमुने ऑस्ट्रेलियातील विविध समुदायांच्या आहार औषध यांची माहिती घेण्यासाठी जमवल्याचे सांगितले जात आहे. हे नमुने 2016 साली ऑस्ट्रेलियाच्या जनगनणेवेळी जमा केले होते. संशोधक जेक ओब्रायन आणि पीएचडी विद्यार्थी फिल चोई यांनी ऑस्ट्रेलियाच्या विविध समुदायातून आहार आणि जीवनशैलीसंबंधित सवयी जाणून घेण्यासाठी नमुने जमा केले होते. त्यांना त्यातून असे आढळले की सामाजिक आणि आर्थिक संपन्न भागात फायबर, सिट्रस (आंबट फळे), कॅफिन (चहा कॉफी) यांचे प्रमाण जास्त होते. तर कमी संपन्न भागात डॉक्टरांकडून घेण्यात येणाऱ्या औषधांचे प्रमाण जास्त आढळले.

थोडक्यात सांगायचे तर संशोधकांना आढळले की श्रीमंत समुदायात राहणाऱ्या लोकांचा आहार अधिक आरोग्यदायी असतो. हे सर्व या लोकांच्या मलमूत्रातून दिसून आले. पहिल्या संशोधकांनी सैद्धांतिक पद्धतीने हे शक्य असल्याचे सांगितले होते. गटाराच्या पाण्याचा वापर करुन देखील या समुदायातील जेवणाचा आणि औषधांसंबंधित ही माहिती मिळेल. या संशोधनात हे पहिल्यांदाच समोर आले. चोई आणि ओब्रायन यांनी सांगितले की या प्रकारच्या संशोधनात जीवनशैलीत होणाऱ्या बदलातून वास्ताविक संकेत मिळतात, ज्याद्वारे सार्वजनिक आरोग्य धोरण बनवण्यास मदत मिळते.

गटरांच्या पाण्याचा तपास करुन समुदाय जाणून घेण्यास मदत होईल. हे दोन दशकांपासून प्रयोगात आहे. युरोपात, उत्तर अमेरिकेत आणि दुसऱ्या जागी याचा वापर औषधात वापरण्यात येणाऱ्या नशेच्या प्रमाणाची तपासणी करण्यास होईल. निकोटीन असलेल्या औषधाचा वापरावर देखील नियंत्रण ठेवता येईल.

Visit : Policenama.com