मानवतेच्या शिकवणीची गरज : प्रा. इनामदार

हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन – सय्यदनगरमधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील सेंट मदर तेरेसा चर्च, लाइफ अ‍ॅबंडन चर्च, साल्वेशन आर्मी चर्च, सेंट लिलियन चर्च येथील मोठ्या संख्येने जमलेल्या ख्रिस्ती बांधवांना व धर्मगुरू फादर यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. येशु ख्रिस्ताची मानवतेची व परोपकराची शिकवण अंगीकारण्याची आज समाजाला गरज आहे, असे मत प्रा. शोएब शफी इनामदार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक शफी इनामदार, फादर ज्यूलियन, फादर जोसेब्वा, फादर अयूब, रेव्ह. रत्नाकर खरात, प्राचार्य जाकिर शेख व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी केले.

पुण्याचे दर्शन घडविणारी दिनदर्शिका : गाडगीळ

पुणे : पर्वती, शनिवारवाडा, अटक किल्ला, रायगड, सिंधुदुर्ग, रावेरखेडी अशा ऐतिहासिक स्थळांचे दर्शन दैनंदिनी जगता जगता दैनंदिनीवरील चित्रातून पेशव्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची आठवण करून देणारी आणि निसर्गचित्रांची पार्श्वभूमी लाभलेली समर्थ पुणे परिवारची दिनदर्शिका आहे, असे मत मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. सारसबाग येथे समर्थ पुणे परिवारच्या दिनर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. वि.वि. तथा उदयसिंह पेशवा, सुधीर गाडगीळ, डॉ. विठ्ठलराव जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) रमेश भागवत, जगन्नाथ लडकत, चित्तरंजन गायकवाड, प्रकाश देवकर, अविनाश बडदे, प्रकाश काब्दुले उपस्थित होते.

भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयींना अभिवादन

धनकवडी : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते वाजपेयींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका वर्षा तापकीर, मोहिनी देवकर, गणेश भिंताडे, महेश भोसले, सचिन बदक, सचिन दांगट, सागर भुमकर, राजाभाऊ पासलकर, नवनाथ तागुंदे आणि नागरिक उपस्थित होते.