अन् रूग्णांवर उपचार करणार्‍या ‘कोरोना’ वॉरियर्सचं अख्ख कुटुंब निघालं ‘पॉझिटिव्ह’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी हा दर दिवसेंदिवस आता कमी होत आहे. या संकटकाळात फ्रंट लाईनवर काम करणारे कोरोना वॉरियर्स दिवसरात्र कष्ट घेत आहेत. आता तर डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी, सफाई कर्मचारी आणि पोलीस यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. यातच मुंबईमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये या डॉक्टरांनी आपलं दु:ख आणि या संकटाच्या भयंकर रुपाबाबत सांगितलेय.

मुंबईच्या एका डॉक्टरने कोरोना बाबतचा आपला अनुभव ‘Humans of Bombay’ या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोनाच्या संकटात मी एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णांवर उपचार करत होतो. मला माहित होतं की सध्या रुग्णांना माझी सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणूनच मी माझं काम करत होतो. दररोज 5 ते 10 रुग्णांवर मी उपचार करत होतो. रुग्णावर उपचार करत असताना स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेतली. मात्र, 18 मार्च रोजी या डॉक्टरांना ताप आला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदललं. डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं.

डॉक्टरांसोबत त्यांची पत्नी आणि मुलीची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांच्या टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आणि संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झालं. त्यामुळे संपर्ण कुटुंबाला कोविड 19 वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. याबाबत सांगताना डॉक्टर म्हणाले, मी माझ्या पत्नीला आणि मुलीला कोव्हिड 19 वॉर्डमध्ये पाहिलं आणि मी हादरून गेलो. स्वत:ला दोष देऊ लागलो. एक डॉक्टर या नात्यानं रुग्णांसाठी जे काही करायला पाहिजे होतं ते मी सर्वकाही केलं. मात्र, स्व:च्या कुटुंबाचं संरक्षण करण्यात कमी पडलो.

दरम्यान, डॉक्टर आणि त्यांची मुलीने कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या पत्नीची तब्येत अजूनही नाजूक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या परिस्थितीबाबत डॉक्टर सांगतात, कोरोनामुळं काही काळासाठी मी माझ्या कुटुंबापासून वेगळा झालो. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी माझ्या पत्नीला पहण्यासाठी आता जास्त वाट पाहू शकत नाही. पण मी शेजाऱ्यांचे आभारी आहे. त्यांनी माझ्या पत्नीच्या जेवणाची काळजी घेतली. डॉक्टरांच्या पत्नीची कोरोनाची चौथी टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.