अमेरिकेत गणपती बाप्पाचा अपमान 

ह्यूस्टन : वृत्तसंस्था

भारतात गणेशोत्सव धूम धडाक्यात साजरा केला जात आहे. पण साता समुद्रापार अमेरिकेत एका जाहिरातीद्वारे गणपती बाप्पाचा अपमान झाल्याचे समजते आहे.अमेरिकेतील टेक्सास येथे एका वृत्तपत्रात राजकीय हेतुकरिता गणपतीच्या जाहिरातीचा वापर केल्याचे समजते आहे. अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीने टेक्सास येथील वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती. त्यात गणपती बाप्पाचे चित्र होते. या जाहिरातीतून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत असे लक्षात आल्यावर या पक्षाकडून हिंदूंची माफी मागण्यात आली .

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae25bc48-bd72-11e8-9766-ed7d22dfdafe’]

अमेरिकेतील अप्लासंख्यांक हिंदू समुदाय मतदारांना आकर्षित करण्याकरिता टेक्सास येथे या जाहिरातीचा वापर करण्यात आला होता. या जाहिरातीत गणपतीचे चित्र वापरण्यात आले होते. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

काय आहे जाहिरात ?

 

“तुम्ही एका गाढवाची पूजा कराल की हत्तीची ? निवड तुमची आहे. “अशा प्रकारचा मजकूर देखील यात वापरण्यात आला होता. या सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीचे चिन्ह हत्ती आहे. तर दुसऱ्या  पक्षाचे चिन्ह गाढव आहे. त्यावरून गणेशोत्सव आणि अमेरिकेतील भारतीय मतदारांना आकर्षित करण्याकरिता अशा प्रकारची जाहिरात  करण्यात आली होती.

 

गणेश विसर्जन सोहळ्यात डीजेवरील बंदी कायम; ‘पाला’ ची याचिका फेटाळली

ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी या जाहिरातीचा निषेध करीत ही जाहिरात म्हणजे हिंदूंचे श्रद्धा स्थान गणेशाचा अपमान आहे असे सांगितले. त्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध करणारे पक्ष “काउंटी इकाई, फोर्ट बेंड काउंटी रिपब्लिकन ने  ‘ माफी मागत हे स्पष्ट केले की या जाहिरातद्वारे कोणत्याही हिंदू रीती रिवाज आणि परंपराचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता.