हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील शेतकरी उध्दवस्त

परळी तालुक्यातील शेतकरी `हुमणी`नं हैराण, महागडी औषधंही पराभूत!

परळी वैजनाथ : पाेलीसनामा ऑनलाईन

तालुक्यात पावसाअभावी अगोदरच निर्माण झालेल्या दुष्काळी स्थिती व ऊसांवर पडलेल्या हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील अनेक गावातील हजारों एकर वरील ऊसाच्या सनकड्या झाल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. हुमणी आळीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64005599-c7ed-11e8-a371-43f841b7ca7d’]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्याल्प पडत आहे. आर्धा पावसाळा संपला तरी मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती उभ्या असलेल्या खरीपाच्या पिकांना हुमणी आळीचा ञास होत असून शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. ऊस पिके हुमणीच्या (उन्नी) हल्ल्याला बळी पडली आहेत. मोठ्या कष्टाने जगवलेली पीकं जळू लागली आहेत. परिणामी विहिरी व बोअरची पाणी पातळी कमी झाली आहे. शेतातील पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.

अगोदर भारनियमनामुळे फटक बसत आहे. शेतकरी उपलब्ध पाण्यावर पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.आता हुमणी आळीने ऐन डल्ला मारल्याने उभे ऊसाचे पिक आहे त्या आवस्थेत वाळून गेले आहे. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करत आहेत मात्र हुमणी आळी त्याला दाद देत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंड आळीने कापूस गेला आणि आता या पीकां बरोबरच प्रामुख्याने मोठ्याप्रमाणावर ऊसाची शेती उध्दवस्त झाली आहे. या पिकांना मोठ्या प्रमाणावर हुमणी आळी प्रादुर्भाव झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी उध्दवस्त होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेली ऐवढी मेहनत वाया गेली आहे. तालुक्यातील लिंबोटा व अनेक गावातील आदी पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे. हुमणी (उन्नी) आळीने ग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातुन जोर धरत आहे.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a5a9d8f-c7ed-11e8-a891-3ffaa2dc1b71′]

परळी तालुक्यातील लिंबोटा गावचे रहिवासी असलेल्या मुक्ताराम नन्हुराव कराड यांचा सहा एकरातील ऊस उद्ध्वस्त होऊन गेला आहे. उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ४ ते १० फूट वाढलेला ऊस नष्ट झालाय. खरं तर हुमणीचा प्रादुर्भाव झालाय हे कळण्यापूर्वीच त्यांचं पीक उद्ध्वस्त झालंय. त्यांच्या ऊसाच्या शेतात पहिल्यांदाच हुमणीचा प्रादुर्भाव झालाय. कराड या शेतकऱ्याला ऊसाचे ५० टन उत्पादन अपेक्षीत होते. मात्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे त्यांचं स्वप्न भंगलंय. अशीच अवस्था परळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्याची झालीय.

हुमणीचा बिमोड करण्यासाठी त्यांनी महागडी औषधी फवारली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कराड यांच्यावर अनेक बँकेचे कर्ज उचलेल आहे. अशा प्रकारच्या नुकसान झाल्याने चिंताग्रस्त झालेले आहेत. ऊस या पिकावर सध्या कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीबाबात माहिती नसल्यामुळे शेतकरी गोंधळला आहे. किडीमुळे खरीप पिकाची वाढ खुंटली आहे. वरवर बघता किड दिसत नाही. मात्र, रोप उपटल्यानंतर मुळाशी कीड दिसून येते. तरी लवकरात लवकर पंचनामे करावेत.
[amazon_link asins=’B01N74LA6J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6fe9a6a0-c7ed-11e8-82e1-1f7a1f878e7c’]

पंचनामे करण्याची मागणी

परळी तालुक्यात ऊसावर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालं असून तालुक्यातील 95 टक्के ऊसावर हुमणी अळीची लागण झाली आहे. यामुळे शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे. परळी तालुक्यातील अनेक गावात हजारो एकर वरील ऊसांवर पडलेल्या हुमणी आळीने ऊसाच्या पिकांत हुमणीच्या हल्लयात नुकसान झाले असल्याने राज्य सरकारने प्रशासनाला आदेश देऊन पंचनामे करून आर्थिक भरपाई देण्यात यावी.

‘त्या’ प्रकरणात धनंजय मुंडे यांना काेर्टाकडून दिलासा