प्रथमच रेल्वे देणार ‘घर ते सीट’पर्यंत सामान पोहचवण्याची ‘खास सर्व्हिस’, ‘या’ ट्रेनमध्ये लवकरच होऊ शकते सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेजस एक्सप्रेसला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन एका नवीन सेगमेन्टमध्ये ट्रेन चालवणार आहे. हमसफर एक्सप्रेसनुसार इंदोर ते वाराणसी रूटवर केवळ थ्री-एसी कोचच्या ट्रेन चालवल्या जातील. सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे या ट्रेनने प्रवास करणार्‍या प्रवाशांना काही खास सुविधा देण्याचा विचार करत आहे.

ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना आपले सामान घेऊन स्टेशनपर्यंत जावे लागते. परंतु, आता लवकरच तुमचे सामान घेऊन जाण्यासाठी खास सुविधा दिली जाणार आहे. या अंतर्गत जर तुम्ही तिकिट बुक केले असेल आणि तिकिट कन्फर्म असेल तर रेल्वे तुमचे सामान तुमच्या घरातून घेईल आणि ते तुमच्या सीटपर्यंत पोहचवेल. अशा प्रकारे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी ट्रेन पोहचल्यानंतर स्टेशनवरून तुमचे सामान घरापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी रेल्वेची असणार आहे. ही सुविधा खुपच कमी शुल्कात मिळणार आहे.

आयआरसीटीसी देशातील दोन प्रायव्हेट ट्रेन लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस आणि अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेसचे संचालन करणार आहे. आता इंदोर-वाराणसी रूटवर तिसरी प्रायव्हेट ट्रेन चालवली जाणार आहे. रेल्वे मंत्री पियूष गोयल मुंबई-अहमदाबाद रूटवर चालणार्‍या देशातील दुसर्‍या प्रायव्हेट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

रेल्वेची नवी योजना
यासाठी अनेक खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. जर ही सुविधा सुरू झाली तर या ट्रेनमधून जे ज्येष्ठ नागरिक किंवा महिला प्रवास करतील त्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत. या लोकांना आपले सामान उचलण्याच्या त्रासापासून दिलासा मिळेल. अशा प्रकारे खासगी कंपन्यांना रेल्वेत सहभागी करून घेतले जाईल.

किती असेल भाडे
प्रायव्हेट हमसफर एक्सप्रेसचे भाडे आयआरसीटीसी ठरवणार आहे. हमसफर एक्सप्रेसपेक्षा 7 ते 10 टक्के जास्त भाडे असू शकते. इंदोर-वाराणसी रूटवर जाणार्‍या पर्यटकांनासुद्धा खास पॅकेज असणार आहे. रेल्वेच्या महितीनुसार, इंदोर-वाराणसी रूटवर टूरिझम वाढू शकते. यासाठी प्रायव्हेट हमसफर एक्सप्रेस सुरू होईल. या ट्रेनमध्ये खाण्या-पिण्यासह दुसर्‍या सुविधाही उपलब्ध असतील. पुढील एक ते दिड महिन्यात या ट्रेन सुरू होऊ शकतात.

150 नव्या प्रायव्हेट ट्रेन
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये प्रायव्हेट ट्रेनची संख्या वाढवण्यावर जोर दिला. बजेटच्या भाषणात त्यांनी म्हटले की, तेजस एक्सप्रेस सारख्या ट्रेनची संख्या वाढवली जाईल. सरकारने 150 नव्या प्रायव्हेट ट्रेन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडलवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस ट्रेनची संख्या वाढविण्यात येईल. ज्या पर्यटन स्थळांवर जातील. 550 रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे.