पुन्हा फेसबुक युजर्सचा डेटा लीक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेटा लीकमुळे अडचणीत आलेल्या फेसबुकच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. फेसबुकच्या कोट्यावधी युजरचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवरुन लीक झाला असल्याचे सायबर सुरक्षा कंपनीने सांगितले आहे.

फेसबुकसाठी काम करणाऱ्या दोन कंपन्या (थर्ड पार्टी) युजर्स संपूर्ण डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड वर स्टोअर करतात. त्यातील मेक्सिकोमधील डिजीटल मीडिया कंपनीकडून हा डेटा लीक झाला असल्याचे अपगार्ड सायबर सुरक्षा कंपनीने म्हटले आहे. या कंपनीने फेसबुक युजर्सचा १४६ जीबी डेटा गोळा केला आहे. त्यात ५४ कोटी यूजरच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाउंटच्या नावांचा समावेश आहे. नक्की किती यूजरचा डेटा त्यात आहे, याची नेमकी आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. तर दुसऱ्या एका कंपनीने २२ हजार फेसबुक युजर्सचे आयडी, फ्रेंडस, फोटो, लोकेशन आणि अनप्रोटेक्टेड पासवर्ड स्टोअर केले आहेत.

अपगार्डच्या सायबर रिस्क रिसर्चचे डायरेक्टर ख्रिस विकारी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व डेटा फेसबुक इंटिग्रेशनद्वारे गोळा करण्यात आला आहे. फेसबुक कंपनी इतर कंपन्यांना एखादे अ‍ॅप किंवा वेबसाईटवर आपल्या माध्ममातून साइन इन करण्याची परवानी देते. त्यामुळे यूजरना डेटा सुरक्षित ठेवण्याची हमी देण्याच कोणताही पर्याय फेसबुककडे शिल्लक राहत नाही. युजरचा डेटा सार्वजनिक डेटाबेसवर स्टोर करणे फेसबुकच्या धोरणांविरोधात आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधून डेटा हाटवण्यात आला. यूजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

अपगार्डच्या सायबर रिस्क रिसर्चचे डायरेक्टर ख्रिस विकरी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व डेटा फेसबुक इंटिग्रेशनद्वारे गोळा करण्यात आला आहे. फेसबुक कंपनी इतर कंपन्यांना (थर्ड पार्टी) एखादे अ‍ॅप किंवा वेबसाइटवर आपल्या माध्यमातून साइन इन करण्याची परवानगी देते. त्यामुळे यूजरना डेटा सुरक्षित ठेवण्याची हमी देण्याचा कोणताही पर्याय फेसबुककडे शिल्लक राहत नाही. ‘यूजरचा डेटा सार्वजनिक डेटाबेसवर स्टोर करणे फेसबुकच्या धोरणांविरोधात आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तात्काळ ऍमेझॉनशी संपर्क साधून डेटा हटवण्यात आला. यूजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दरम्यान, ऍमेझॉनने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत अॅमेझॉननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.