व्हाईटनरच्या नशेत गुरफटलीत शेकडो मुले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

व्हाईटनरच्या नशेच्या आहारी गेलेली औरंगाबाद शहरात शेकडो मुले असल्याचा अंदाज पोलिसांच्या विशेष शाखेने वर्तवला आहे. मागील दोन आठवड्यात या व्यसनाच्या आहारी गेलेल्या पन्नास ते साठ मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केल्याची माहिती विशेष शाखेने दिली. विशेष शाखेच्या रेश्मा सौदागर, उपनिरीक्षक गोरख चव्हाण, उदार, बी. डी. मिच्छद्र चव्हाण यांच्याकडे अशा व्यसनात गुरफटलेल्या मुलांची शोध मोहीम सोपविण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ba5e65e-be20-11e8-8262-3596d0284574′]

काही दिवसांपूर्वीच एक महिला तिच्या चार मुलांना घेऊन पोलीस आयुक्तालयात आली होती. चारही मुले ही बारा वर्षांखालील होती. तिची दोन मुले व्हाइटनरची नशा करतात अशी तक्रार घेऊन ती आली होती. ही दोन मुले मागील काही दिवसांपासून सतत अस्वस्थ दिसून येत होती. तसेच त्यांच्या चेहऱ्यातही विलक्षण बदल झाल्याचे दिसून येत होते. या महिलेचा मोठा मुलगा हा व्हाइटनरची नशा करत आहे तर दुसरा सात वर्षांचा मुलगाही अलिकडे व्हाइटनरच्या नशेच्या आहारी गेल्याचे समजले. हा प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ही महिला सांगत होती की, तिचा पती फलक बनवण्याचे काम करतो. ती धुण्याभांड्याची कामे करते. दोघेही कामानिमित्त बाहेर असल्याने घरात मुले काय करतात, हे लवकर समजले नाही. मात्र अलीकडे मोठ्या मुलाने शाळाही सोडली. त्याची वाढ खुंटली, वागण्यात बराच फरक जाणवू लागला. एक रुमाल घेऊन तो काहीतरी हुंगत असल्याचे दिसत असे. त्याला बरेच समजावले, पण ऐकत नव्हता. आमच्या भागातील मुलांना पोलिसांनी पकडले म्हणून आज पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांना भेटायला आले.याबाबत डॉ. दीपाली धाटे यांनी सांगितले की, नशेच्या आहारी गेलेल्या या मुलांचा समुपदेशन करण्यात येणार असून त्यांना नशेचे साहित्य पुरविणाऱ्या दुकानदारांनाही नोटीस बजावण्यात येणार आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या

उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर आदी जवळपास सर्वच भागातील झोपडपट्टीतील बहुतांश मुले ही व्हाइटनरच्या नशेच्या आहारी गेल्याचे आढळून आले आहे. व्हाईटनर, स्टिकफास्ट एका रुमाल किंवा कपड्यावर टाकायचे आणि त्याला हुंगत रहायचे. दोन-तीन तास माणूस गुंग होतो. दहा ते पंधरा रुपयांत ही नशा करता येते. या नशेच्या आहारी गेलेली मुले पोलिसांशीच मोठ्या आवाजात बोलतात. आम्ही काय केले, चोरी थोडीच केली आहे, अशी त्यांची भाषा असते.  विशेष म्हणजे दारुतील अल्कोहलसारखे वैद्यकीय तपासणीत याबाबतीत काहीच आढळून येत नाही.

दोन आठवड्यापूर्वी वाळूजमध्ये नबी नावाच्या तरुणाकडे नायट्रेशनसारख्या नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा सापडला होता. नायट्रेशनची एक गोळी घेतली तर दीड दिवस माणूस गुंगीत असतो. मात्र, नबी हा दिवसभरात १२ ते १४ गोळ्या घेत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

 

सर्जिकल स्ट्राइकचा वर्धापन दिन वादात, सक्ती नसल्याचे जावडेकरांचे स्पष्टीकरण

मंत्रिमंडळ विस्तार : नवरात्रौत्सवात खडसेंना देवी पावणार?

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50119d6e-be21-11e8-bcc3-f1edcbd5f36c’]