भद्रावतीत शेकडो युवकांचा युवासेनेत प्रवेश

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – ‘येथील युवा सेनेचे तरुण तडफदार कार्यकर्ते हर्षल शिंदे यांची युवा सेनेच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती होताच भद्रावती शहरातील शेकडो युवकांनी नुकताच युवा सेनेत प्रवेश केला.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आणि हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या युवकांनी युवा सेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा युवा सेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम, कार्यकारिणी सदस्य रुपेशदादा कदम, चंद्रपूर जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

यावेळी युवा सेनेत प्रवेश केलेल्या युवकांचे हर्षल शिंदे यांच्या हस्ते युवा सेनेचे दुपट्टे देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा समन्वयक पप्पू सारवन, तालुका प्रमुख महेश जीवतोडे, कल्याण मंडल, अमोल कोल्हे आणि असंख्य युवकांची उपस्थिती होती.