अखेर ‘त्या’ पोलिस निरीक्षकाविरोधातील उपोषण मागे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्यचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर प्राणंतिक आमरण उपोषण सुरू केले होते आणि उपोषण दुसऱ्या दिवशी पोलिस उपाधीक्षक सातव यांच्या सोबत केलेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले. त्यांनी सदर हल्ल्यातील आरोपींना बारा तासांच्या आत अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

14 मार्च गुरूवारी राञी 9 ते 9.30 दरम्यान शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालक, मालक, क्लिनर व इतरांना हल्ला केला. शासकीय धान्याची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालक व ठेकेदारासह इतरांची या प्रकरणात पाठराखण करून पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास व त्यांच्यावर कडक कलमे न लावता त्यांना गुन्हा घडुन चार दिवस झालेनंतरही अटक केलेली नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे. धान्याची तस्करी करणाऱ्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार व पुरवठा निरीक्षका सहआरोपी करावे. प्रशासनाच्या गुन्हेगार बचाव धोरणाच्या विरोधात, तसेच श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांना निलंबित करण्याची मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस उपअधीक्षक सातव यांनी आंदोलक पितळे व इतरांशी चर्चा केली. फरार आरोपींना तात्काळ अटक केली जाईल, गुन्ह्याचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषण सोडविण्यासाठी भाजप नेत्या सुवर्णा पाचपुते, रासप तालुका अध्यक्षा रूपाली काळे, पञकार उत्तम राऊत, शिवाजी साळुंके, अंकुश शिंदे, विशाल चव्हाण, सुभाष शिंदे, यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी उपसभापती प्रतिभा झिटे, दिपक काळे, रमेश जगताप, सुरेश दांडेकर, किरण मखरे, अमोल तंटक, अनिल ठवाळ, दत्ताञय जगताप, निलेश नागवडे, अनंता पवार, अ‍ॅड. बाळासाहेब काकडे आदि उपस्थित होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक सातव व पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या हस्ते लिंबू पाणी देवुन उपोषणार्थी जितेंद्र पितळे व प्रा. बाळासाहेब बळे यांनी उपोषण सोडले.