अमेरिकेला धडकणार भयानक चक्रीवादळ ; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सतर्कतेचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील फ्लोरिडाच्या दिशेनं एक भीषण डोरियन चक्रीवादळ वेगाने येत आहे. रविवारी रात्री ते फ्लोरिडा शहरामध्ये पोहचेल. त्यामुळे फ्लाेरीडाच्या रहीवाशांनी सज्ज राहावे. असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून केले आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी तयार राहावे. तसेच राज्याकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

हे एक मोठे चक्रीवादळ असेल. कदाचित आजपर्यंच्या येऊन गेलेल्या सर्व चक्रीवादळांपेक्षाही मोठे असेल. हे चक्रीवादळ मोठी हानी पोहचवू शकते. याच्या आधी अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये ‘इरमा’ नावाच्या चक्रीवादळाने मोठी हानी पोहचवली होती. ज्यामध्ये काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला होता.

मागच्या वेळेस फ्लोरिडा मध्ये जेव्हा चक्रीवादळ आले होते तेव्हा मूळ भारतीय वंशाच्या हजारो अमेरिकन नागरिकांसोबत लाखो नागरिकांना फ्लोरिडा मधून बाहेर काढले गेले होते. याशिवाय या वर्षाच्या सुरवातीस अल्बामा आणि जॉर्जिया शहरामध्ये वादळाने मोठी हानी पोहचवली होती. ज्याच्या सपाट्यात सापडल्यामुळे तब्बल दोन डझन लोकांना आपले जीव जमवावे लागेल होते. या वादळामध्ये अनेक घरेही नष्ट झाली होती. या वादळामुळे अल्बामा मधील २२ लोकांचे जीव गेले होते तर अनेक लोकांना शारीरिक इजा पोहचली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like