अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला भयंकर चक्रीवादळाचा धोका

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला भयंकर अशा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या फ्लोरेन्स चक्रीवादळापासून वाचण्यासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या भागात मागील काही दशकातील हे सर्वात मोठे चक्रीवादळ असू शकते, असा इशारा येथील हवामान विभागाने दिला आहे.

या वादळाची पूर्व सूचना मिळाल्यानंतर दक्षिण कॅरोलायनाच्या गव्हर्नरने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले आहेत. तर उत्तर कॅरोलायना आणि व्हर्जिनियामध्ये आपतकालीन स्थिती जारी करण्यात आली आहे. चक्रीवादळापासून वाचण्यासाठी लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. हे भयंकर असे चक्रीवादी गुरूवारपर्यंत कॅरोलायनामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय आवकाश संशोधन केंद्रातून फ्लोरेन्स चक्रीवादळाचे छायाचित्र घेण्यात आले असून ते खूपच गंभीर परिणाम दर्शविणारे आहे.

सनी लिओनी ‘आमदार निवास’ मध्ये   

येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फ्लोरेन्स चक्रवादळ आता क्रमांक चारचे वादळ झाले आहे. या वादळामुळे १९५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वहात आहेत. फ्लोरेन्स सोमवारी सकाळी दुसèया श्रेणीत होते आणि ते उत्तर कॅरोलायनाच्या दक्षिण पूर्वेच्या केप फयिरपासून २ हजार किलोमीटर दूर होते. येथील हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, हे चक्रीवादळ पाचव्या श्रेणीतील वादळ होऊ शकते. कारण या वादळाला अ‍ॅटलांटिक समुद्राच्या गरम पाण्यामुळे बळ मिळत आहे. नॅशनल हॅरिकन सेंटरने या फ्लोरेन्सला सर्वाधिक भयंकर मौसमी घटना म्हटले आहे. या वादळामुळे किनाऱ्यावर व आतील भागात मोठी हानी होऊ शकते. फ्लोरेन्समुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. किनाऱ्यावर अजस्त्र लाटा आदळू शकतात. तसेच अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन हा भाग जलमय होऊन हाहाकार उडू शकतो. दरम्यान, या वादळाच्या शक्यतेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिसीसीपीमध्ये होणारी त्यांची रॅली रद्द केली आहे.

[amazon_link asins=’B0778JFC13,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff5ded5b-b5af-11e8-872f-9d8d9c7c526d’]