‘महा’ चक्रीवादळाचा जोर ओसरणार ! पावसाचा इशारा ‘कायम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ या तीव्र चक्रीवादळाचे स्वरूप आता सौम्य झाले असून, पुढील 24 तासांत त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने होणार आहे. त्याचा फटका गुजरातला तुलनेने कमी बसणार आहे. त्याचबरोबर उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळेल तसेच 8 नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळाचा प्रभाव कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महा चक्रीवादळ पुढे सरकत असतानाच जोर ओसरत आहे. मात्र तरीदेखील गुजरातला देण्यात आलेल्या पावसाचा इशारा कायम आहे. भावनगर, सुरत, भरुच, आनंद आणि वडोदरासह बटोड आणि अहमदाबादमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल. तर मध्य महाराष्ट्रातील काही तालुक्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

परतीचा मान्सूननंतर अरबी समुद्रात आलेल्या ‘क्यार’ वादळाची तीव्रता कमी होत असतानाच महावादळ आले. या बदलांमुळे नोव्हेंबर उजाडला तरी महाराष्ट्रात पाऊस सुरूच आहे.

Visit : Policenama.com