हुर्रियत नेते केंद्र सरकारबरोबर ‘चर्चेस’ तयार, काश्मीरवर चर्चेतून मार्ग काढण्याचा हुर्रियतचा ‘कल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरक्षा एजन्सींचा वाढता दबाव पाहून अखेर हुर्रियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक यांनी सांगितले की हुर्रियत सरकारबरोबर चर्चा करण्यास तयार आहे. ते म्हणाले की ही सकारात्मक बाब आहे.

सत्यपाल मलिक यांनी सांगितले की हुर्रियतचे (एम) अध्यक्ष मीरवाइज उमर फारुक यांच्याकडून सरकारसोबत चर्च करण्याची तयारी दर्शवने हे चांगले संकेत आहेत. मलिक यांनी सांगितले की हुर्रियतचे सामाजिक मुद्यांवर चर्चा करण्याबाबत स्वागत करणे गरजेचे आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करा –

मीरवाइज यांनी श्रीनगरमधील एका कार्यक्रमात सांगितले की, केंद्र सरकारला बहुमत मिळाले आहे त्यामुळे काश्मीर मु्द्दयावर मार्ग काढण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करावी. ते पुढे असे ही म्हणाले की, अशा कोणत्याही सकारात्मक प्रयत्नांचे हुर्रियत समर्थन करते. हुर्रियतची ही भूमिका काश्मीर मधील राजकारण आणि परिस्थितीत होणारे बदल यामुळे बदलताना दिसत आहे.

मीरवाइज नजरकैद –
मीरवाइज यांना शुक्रवारी दोन दिवसासाठी श्रीनगर मधील त्यांच्या घरात नजरकैद करण्यात आले होते. आता ते त्यांच्या घरातून बाहेर पडू शकणार नाहीत. परंतू पोलिसांनी नजरकैद का केले यांचे कारण मीरवाइस उमर फारुक यांना सांगण्यात आलेले नाही.