Hurun Global Rich List : मुकेश अंबानी जगातील 8 वे श्रीमंत अब्जाधीश, एलन मस्क टॉपवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेतच, सोबतच ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. या दरम्यान, ग्लोबल रिच लिस्ट 2021 नुसार अंबानी जगातील 8 वे अब्जावधीश म्हणून समोर आले आहे. ज्यांची संपत्ती यावर्षी वाढून 6.09 लाख कोरी रुपये म्हणजेच 83 अब्ज डॉलर झाली आहे. मागील वर्षी अंबानी यांची संपत्ती 4.84 लाख कोटी रुपये होती. दरम्यान जोंग शेनशन हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ज्यांच्या मालमत्तेचे मूल्य. 85 अब्ज आहे.

अदानी शिव नादर यांच्याही नावाचा समावेश
ग्लोबल रिच लिस्टच्या या यादीत अंबानी यांच्यासोबतच इतर भारतीयांचा देखील समावेश आहे. ज्यात गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती 2.34 लाख कोटी रुपये, शिव नागर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती 1.94 लाख कोटी रुपये, लक्ष्मी निवास मित्तल यांची 1.40 लाख कोटी रुपये, सीरम इंस्टीट्यूटचे सायरस पुनावालाची संपत्ती 1.35 लाख कोटी रुपये, अशोक लिलॅन्डचे हिंदुजा बंधूंची संपत्ती 1.31 लाख कोटी रुपये, आणि बँकर उदय कोटक यांची संपत्ती 1.08 लाख कोटी रुपये आहे. अहवालानुसार या यादीत 68 देशांतील 3,228 अब्जावधीशांपैकी 209 भारतीय आहे. एवढेच नव्हे 177 अब्जावधीश देशातच राहतात. दरम्यान, भारतातील बहुतेक अब्जावधीक पारंपारिक व्यवसाय करणारे आहेत. तर अमेरिका आणि चीनमध्ये टेक्नोक्रॅट्स जास्त संख्येने अब्जाधीशांची आहे. त्याचवेळी देशातील 118 अब्जावधीश असे आहेत, जे स्वतःच्या हिमतीवर आहेत, तर 91 जणांना वडिलोपार्जित मालमत्ता मिळाली आहे.

एलन मस्क सर्वात श्रीमंत व्यक्ती
टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 नुसार त्यांची मालमत्ता 197 अब्ज आहे. तर अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस 189 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. 114 अब्ज डॉलर्ससह एलएमव्हीएचचा बर्नार्ड अर्नाल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 110 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या आणि वेगवान अब्जाधीशांमध्ये आहेत आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 101 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत.