‘त्या’ गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि सासऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पती आणि सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून ७ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने ३ ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी तिचा पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अश्वीनी ओंकार जट्टेगोपाळ (वय १९ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तर याप्रकरणी ओंकार सिद्धप्पा जट्टेगोपाळ (वय २४ वर्षे), सिध्दप्पा माधप्पा जट्टेगोपाळ यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायलायाने ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी सासू भगिरथी जट्टेगोपाळ हिचा पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी मृत महिलेची आई भीमाबाई महादेव कोळी (वय ३६, रा. हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी हांडेवाडी रोड परिसरात घडली.

दोन वर्षांपुर्वी अश्वीनीचा विवाह पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ओंकारशी झाला. त्यानंतर लग्न झाल्यापासून ओंकार हा तिचे फेसबुक वारंवार तपासत असे. लग्नातंतर काही दिवसांनी ती गरोदर राहिली. त्यावेळी तिच्या पोटातील मुल माझे नाही असे म्हणत त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर सासू, सासरे यांनी तिची ७ महिन्याची गरोदर असतान कोणतीही काळजी घेतली नाही. याउलट तिला टोचून बोलत त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान या त्रासाला कंटाळून अश्वीनीने २१ एप्रिल रोडी ती राहात असलेल्या इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पती आणि सासऱ्याला अटक केली. सरकारी पक्षाच्या वतीने याप्रकरणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली. ती न्ययालायने मान्य करत त्या दोघांना ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.