Pune : प्रियकराचा प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने केला खुन; पुणे जिल्ह्यातील घटना

राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराचा प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेश वसंत लोहकरे (वय-26 रा. गोळी कारखाना समतानगर, ता. खेड) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

महेश लोहकरे याचे भरत भोरु ढोंगे (रा. आव्हाड ता. खेड) याच्या पत्नीसोबत पुर्वीपासून प्रेमसंबंध होते. ढोंगे बरोबर लग्न झाले तरी लोहकरे याचे ढोंगे याच्या पत्नीकडे व घराकडे येणे जाणे सुरु होते. या दोघांचे काहीतरी प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय ढोंगे याला आला होता. ढोंग याने पत्नीला विश्वासात घेऊन हा प्रकार थांबवण्यास सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाले. तसेच लोहकरे याला दोन वेळा ढोंगे याने मारहाण केली होती. लोहकरे याचा काटा काढण्याचा प्लॅन ढोंगे याने पत्नीला विश्वासात घेऊन रचला.

लोहकरे 3 एप्रिल रोजी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. भरत ढोंगे याने त्याच्या पत्नीसोबत महेशचे अनैतिक संबंध आहेत. अशा संशयावरुन घातपात केला असावा, अशी तक्रार महेश लोहकरे याच्या आईने 6 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान पोलिसांनी प्रत्येकाचे मोबाईल लोकेशन तपालसे. लोहकरेच्या घरच्यांना विश्वासात घेत माहिती घेतली. ढोंगेच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन उलट तपासणी केली असता, ती घाबरल्याचे दिसून आले. पोलिसांना संशय येताच पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

पोलिसांनी ढोंगे याला सांगितले, तुझ्या पत्नीने सर्व काही खरे सांगितले आहे. आम्हाला तू लवकर सांग काय खरे आणि काय खोटे. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लोहकरे याच्या खून केल्याची कबुली दिली. लोहकरे याला राजगुरुनगर बसस्थानकासमोर माझ्या पत्नीने एका रुममध्ये कोंडून घेतले. दरम्यान मला फोन करुन सांगितले. मी व पत्नीचा भाऊ व एका मित्राच्या मदतीने लोहकरे याला मारहाण केली. तसे त्याला गाडीत बसवून पत्नीच्या आई-वडिलांसमोर माफी माग असे सांगून आंबेगाव तालुक्यातील घनदाट जंगलात नेऊन लोहकरे याला झाडाला फाशी दिली. त्याचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील गोहे येथे आरोपीच्या घरापासून तीन किमी अंतरावर जमिनीत पुरला. पोलिसांनी ढोंगे व त्याच्या पत्नीला अटक केली असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.