गौरवास्पद ! राज्यसेवेच्या परीक्षेत दाम्पत्याची ‘बाजी’, पती ‘अव्वल’ तर पत्नी दुसर्‍या क्रमांकावर

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगड येथील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकालही लागला. या निकालात नवलं करण्यासारखी गोष्ट म्हणजे सीएमओ पदासाठी आलेल्या मेरिट लिस्टमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवणारे एक जोडपं आहे. या लिस्टमध्ये पतीने पहिला तर पत्नीने दुसरा क्रमांक पटकवला आहे. पतीचे नाव अनुभव सिंह आणि पत्नीचे नाव विभा सिंह असे आहे.

CGPSC ने मुख्य नगरपालिका अधिकारी ग्रेड ए आणि बी श्रेणीत ३६ जागांसाठी जाहिरात निघाली होती. यात लेखी परीक्षा आणि मुलाखत अशी प्रक्रिया होती. त्याचा निकाल १० जुलैला लागला असून यात अनुभव यांना ३०० पैकी २७८ तर विभा यांना २६८ गुण मिळाले. तसंच मुलाखतीतही अनुभव यांनी ३० पैकी २० गुण मिळवले तर विभा यांना १५ गुण मिळाले आहेत.

एकाच परिक्षेत दोन्ही नवरा बायको पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आल्याने त्यांचे कौतुकही होत आहे. दोघेही रायपूरचे असून मेरिट लिस्टध्ये मागेपुढे नंबर लागल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही एकमेकांना मदत करत यश मिळवले, अशी प्रतिक्रिया या जोडप्याने दिली आहे.

दरम्यान, अनुभव आणि विभा दोघेही सरकारी नोकरी करत होते. त्यासोबत वरच्या पदासाठी दोघेही प्रयत्न करत होते. अनुभव यांनी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नोकरी सोडली होती. तर विभा काम करून नोकरी करत होत्या. विभा दिवसभरातून काम करून आल्यानंतर नवऱ्यांने काढलेल्या नोट्स वाचायच्या, तसंच रात्री दोघे एकत्र बसून अभ्यास करायचे. एकमेंकाना साथ देत अभ्यास केला हेच त्यांच्या यशाचे गुपित असावे. त्यामुळे दोघांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

आरोग्यविषयक वृत्त –