पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून पतीने केले विष प्राशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील अप्पर बिबवेवाडी येथे समोर आला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे.

कुंडलिक पांडुरंग गाडेकर असे पतीचे नाव आहे. तर चित्रा कुंडलिक गाडेकर असे पत्नीचे नाव आहे. दोघांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अंत्यवस्थ आहे. याप्रकरणी कुंडलिक गाडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडेकर पती पत्नी अप्पर इंदिरा नगरमधील श्रेयस नगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान कुंडलिक गाडेकर हा चित्रा गाडेकर हिच्या चारित्र्याच्या संशय घेत होता. तेव्हा त्यांच्यात यावरून वादही होत होते. दरम्यान १० जून रोजी पहाटे त्यांच्याक पुन्हा वाद झाले.

त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात कुंडलिक याने पत्नी चित्रा हिच्यावर चाकूने वार केले. तर त्यानंतर त्याने स्वत: विष पिले. त्य़ानंतर यासंदर्भात पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोघांनाही त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चित्रा यांच्या पोटावर, छातीवर डाव्या पायावर वार करण्यात आले आहेत. दोघांचीही प्रकृती अंत्यवस्थ आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

हस्त मुद्रांचे अनेक फायदे ; थायरॉइड, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या होतील दूर

फक्त ७ दिवसांमध्ये वजन कमी करण्याचे प्रभावी ‘हे’ ११ उपाय

डायबिटीज नियंत्रितणात ठेवायचाय ? करा ‘हे’ रामबाण उपाय

डायबिटीज नियंत्रितणात ठेवायचाय ? करा ‘हे’ रामबाण उपाय