पुणे : चारित्र्याच्या संशयावरून सपासप वार करून पत्नीचा निर्घृण खून

मावळ/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्निचा खून केल्याची धक्कादायक घटना माळवमध्ये घडली आहे. पतीने धारदार कोयत्याने पत्नीवर सपासप वार करून तिचा खून निर्घृण खून केला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना आज (रविवार) सकाळी उघडकीस आली आहे. पतीनं केलेल्या हल्ल्यात आबेदा शेख (वय-32) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पती फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास आबेदा ही नेहमीप्रमाणे खासगी कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाली होती. पती करीम हा तिचा पाठलाग करत अर्ध्या वाटेपर्यंत आला. त्याने सोबत आणलेल्या धारदारकोयत्याने आबेदा हिच्या डोक्यावर आणि हातावर पाच ते सहा सपासप वार केले. पत्नीवर हल्ला करून आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आबेदाला काही नागरिकांनी उपचारासाठी देहूरोड येथील आधार रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

आरोपी करीम शेख हा पत्नी आबेदा हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. याच संशयावरून झालेल्या वादातून अखेर करीम याने तिचा निर्घृण खून केला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस आरोपो करीमचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like