पती शाहरुख खान ‘या’ कपड्यांमध्ये मला पाहू शकत नाही, गौरी खानचा ‘खुलासा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलवूड स्टार शाहरुख खान आणि गौरी खान गेल्या 29 वर्षांपासून बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. 1991 साली शाहरुख आणि गौरी विवाहबद्ध झाले होते. याच्याही खूप वर्षे आधीच दोघं एकमेकांना डेट करत होते. शाहरुख गौरीला घेऊन खूप पजेसिव होता. गौरीला कारही कपड्यात पाहणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. खुद्द गौरीनंच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता.

1997 मध्ये सिमी गरेवालच्या शोमध्ये शाहरुख आणि गौरीनं हजेरी लावली होती. यावेळी शाहरुख गौरीला घेऊव प्रोटेक्टीव होता का असा प्रश्न सिमीनं विचारला होता. यावर उत्तर देताना गौरी म्हणाली, “खूप पजेसिव होता. तो मला व्हाईट कलरचा शर्टही घालू देत नव्हता.”

गौरी म्हणाली, “शाहरुखला वाटायचं की, व्हाईट कलरचा ड्रेस ट्रान्सपरंट असतो.” यावर शाहरुख म्हणाला, “मला वाटायचं की, हे खूप असभ्य आहे. मला गौरीपासून दूर जाण्याची भीती वाटायची. मी खूप खराब झालो होतो.”

शाहरुखपासून दूर गेली होती गौरी

शाहरुखच्या पजेसिवनेसमुळं कधी दूर गेलीस का असं विचारल्यावर गौरी म्हणाली, “मी शाहरुखपासून खूप वेळ दूर गेले होते. मला वाटायचं की, त्याला हे समजावं. मी त्याला असंही म्हटलं होतं की, तू मला पुन्हा कधीच नाही दिसणार”

शाहरुखनं सांगितंल की, मी गौरीसाठी एवढा पागल झालो होतो की, तिनं जर स्विमसूट घातला किंवा केस मोकळे सोडले तर मी तिच्याशी भांडायचो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like