पतीचे ‘त्या’ महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजलं, पत्नीनं काही क्षणातच जीवन संपवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जालंधरच्या पतारामध्ये 2 मुलांच्या आईने अन्न धान्यांना किड लागून नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले. एका वृत्तानुसार पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याने नैराशातून महिलेने आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव मीना कुमारी आहे.

मृतक महिलेच्या नातेवाईकांना तसेच माहेरच्यांना महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली तेव्हा ते तात्काळ मीनाच्या सासरी पोहचले आणि तिला रुग्णालयात हलवण्यात आले. परंतू महिलेने जीव सोडला. डॉ. बीएस जौहल यांनी सांगितले की सल्फास म्हणजेच किडनाशक गोळ्याचे विष मीनाच्या शरीरात पसरलेले होते. त्यामुळे तिला वाचवण्यात यश आले नाही.

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच आईला रुग्णालयातच रडू कोसळले. मृतक महिलेल्या नातेवाईकांनी सांगितले की त्यांचे सकाळी मीनाबरोबर फोनवर बोलणे झाले होते. ती म्हणाली की ती पतीला कंटाळून आत्महत्या करत आहे.

नातेवाईकांच्या मते मीना आणि तिच्या पतीमध्ये पहिल्यांदा देखील वाद झाला होता परंतू वाद मिटवण्यात आला होता. असे असताना पतीमध्ये सुधारणा न झाल्याने कंटाळून महिलेने आत्महत्या केली. मृतक महिलेल्या वडीलांनी सांगितले की मुलीच्या मृत्यूसाठी तिचा पती जबाबदार आहेत.

पोलिसांनी सांगितले की मृतक महिलेच्या वडीलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृतक मीनाने रविवारी सकाळी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. फरार आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रेड मारण्यात येत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like