पत्नी सेक्स करू देत नसल्यानं पतीची आत्महत्या ! पोलिसात FIR दाखल

अहमदाबाद : वृत्तसंस्था –    शाहेरकोटदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. लग्न होऊन जवळपास 2 वर्षे झाली तरीही पत्नी सेक्स करू देत नाही म्हणून निराश होत पतीनं आत्महत्या केली आहे. शाहेरकोटदा पोलिसांनी पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल 32 वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुरेंद्रसिंह असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे. सुरेंद्रसिंहची आई मूली परमार(55) यांनी 6 ऑगस्ट रोजी पत्नी गीता परमार हिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी गीतावर आरोप केलाय की, तिनं सुरेंद्रसिंहला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे. पोलिसांनी गीताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सुरेंद्रसिंहच्या आईनं केलेल्या तक्रारीनुसार, सुरेंद्रसिंह हा रेल्वेत काम करत होता. 2018 साली त्यानं गीतासोबत लग्न केलं होतं. 2016 साली त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. गीता देखील घटस्फोटीतच होती. एकदा मी मुलाच्या खोलीत गेले तेव्हा सून आणि मुलगा दोघंही वेगळ्या बेडवर झोपले होते. जेव्हा मी मुलाला याबाबत विचारलं तेव्हा त्यानं मला सांगितलं की, आमच्या अद्याप कोणतेही शारीरिक संबंध झालेले नाहीत असं आईचं म्हणणं आहे. तिला कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते असा आरोप सुरेंद्रसिंहच्या आईनं तक्रारीत केला आहे.