पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – पतीमुळे पत्नीने आत्महत्या केल्याची घटना अनेकदा आपण वृत्तपत्रात वाचल्या असतील. औरंगाबाद येथील तरुणाने चक्क पत्नी नांदण्यासाठी परत येत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली आहे. २७ वर्षीय विवाहित तरुणाने घरातील फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.११) उघडकीस आली आहे.

प्रमोद ज्ञानदेव पिकवणे (वय – २७ रा. पौळाचीवाडी, ता. गेवराई, जि. बीड, ह.मु. वडगाव कोल्हाटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पत्नी विद्या आणि सासरे भिवसेन भवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद हा वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये काम करत होता. विद्या आणि प्रमोद यांचे २०१२ साली लग्न झाले. काही दिवस संसार सुरळीत चालला. त्यांना दोन मुले झाली कार्तिक आणि मयूर असे या दोघांचे नाव आहे. काही दिवसानंतर मात्र दोघा पती-पत्नीमध्ये भांडणे व्हायला लागली. रोजच शाब्दिक कुरबुरी व्हायला लागली. त्यामुळे विद्या रागाने माहेरी निघून गेली. दोघांचे भांडणे मिटविण्यासाठी प्रमोदचे वडील ज्ञानदेव हे विद्याला आणायला तिच्या माहेरी गेले. मात्र विद्या त्यांच्यासोबत परत आली नाही. प्रमोदने देखील अनेकदा विद्याला नांदायला येण्याबाबद विनंती केली. मात्र विद्याने येण्याबाबद स्पष्ट नकार दिला.

८ डिसेंबर रोजी प्रमोद काम करत घरात बसलेला होता. संध्याकाळी ७ वाजता त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी आला. मात्र प्रमोद दार उघडत नसल्याने त्याने त्याच्या वडिलांना खाली बोलावले त्यांनी बऱ्याचवेळा दरवाजा वाजवला परंतु त्याने दरवाजा न उघडल्याने दोघांनी मिळून दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्या नंतर प्रमोदने आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ प्रमोदला खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी प्रमोदच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पत्नी विद्या आणि सासरे भिवसेन भवर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.