धक्कादायक ! ‘तलाक’ देण्यास ‘नकार’ दिल्याने पतीने कापले पत्नीचे ‘नाक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहेरी तलाक विधेयक संसदेत नुकतेच समंत झाल्यानंतर मात्र याच संबंधित उत्तर प्रदेशच्या सीतापूर परिसरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली. सीतापूरच्या खिराबाद येथे ही तिहेरी तलाकसंंबंधित खळबळजनक घटना घडली. एक क्षुल्लक कारणाने पतीने पत्नीला तलाक दिला आणि थेट नाकच कापले. हुंड्याच पत्नीकडून दुचाकी देण्यात न आल्याने पतीने थेट पत्नीला तलाकच दिला आहे.

पतीकडून दुचाकीची मागणी
रुखसाना चाहिचा १४ मे २०१९ ला बरकत अली यांच्या बरोबर निकाह झाला होता. निकाहच्या दुसऱ्याच दिवशी १५ मेला पतीने पत्नीकडे सोडचिठ्ठी मागितली. यादरम्यान पतीने पत्नीच्या सासरच्या मंडळीकडून ३५ हजार रुपयांची मागणी केली. नातेवाईकांना संपर्क साधला बरकतने सांगितले की हुंड्यात दुचाकी न दिल्याने पत्नीचा स्वीकार करु शकत नाही.

रुखसानाने पतीला आणि सासरच्या मंडळीना कॉल केल्यानंतर सासू सासऱ्यांकडून तिला शिवीगाळ करण्यात आला. त्यानंतर ३ ऑगस्टला रुखसानाला तिच्या पतीचा कॉल आला आणि हुंड्यात दुचाकी देत नसल्याने तलाक देत असल्याचे फोनवरच सांगितले.

तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा दाखल
यानंतर पत्नीने तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली, पतीने तिला तक्रार मागे घेण्यास देखील सांगितले परंतू पत्नीने याला नकार दिल्यानंतर पतीने तिचे नाक कापले. सध्या जखमी झालेल्या रुखसानावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीवर नव्या तिहेरी तलाक विधयकानुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त