नाश्त्यात ‘केस’ आढळल्याने नवऱ्याने ‘पत्नी’चं केलं ‘केशवपन’, आता भोगतोय ‘तुरुंगवास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेवणात केस सापडल्याने एका माथेफिरु पतीने थेट आपल्या पत्नीचे केशवपन केले. जेवणात केस दिसल्याने पतीने नाराज होऊन त्याने पत्नीचे केसच कापले. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी या माथेफिरुला ताब्यात घेतले.

हा प्रकार बांग्लादेशच्या जोयपूरहाट जिल्ह्यातील गावात घडला. 35 वर्षीय बबलू मंडलच्या पत्नीने त्याला नाश्ता म्हणून दूध भात दिला होता. या नाश्त्यात त्याला केस आढळला. त्यानंतर भडकलेल्या पतीने थेट आपल्या पत्नीचे केशवपन केले. स्थानिक पोलीस शहरयार खान यांनी दिलेल्या माहितीनुसार गावकऱ्यांना तक्रार दाखल केल्यानंतर बबलू याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पहिले कापले केस आता खातोय जेलची हवा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबलू याच्या नाश्त्यात केस आढळल्याने त्याला आपल्या पत्नीला दोषी मानले आणि त्यानंतर रेजर घेऊन आपल्या पत्नीचे केशवपन केले. त्याचा हा गुन्हा मुद्दामून केला आहे. त्याला 14 वर्षाचा तुरूंगवास ठोठावण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की बांग्लादेशात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. महिलांची स्थिती गंभीर आहे. या घटनेवरुन अंदाज बांधला जाऊ शकतो की महिलांची परिस्थिती काय आहे. येथे 1 दिवसात तीन महिलांचा बलात्कार होतो.

एक संघटनेच्या मते, जानेवारी ते जून महिन्यात बांग्लादेश मध्ये 630 महिलांवर बलात्कार झाला. 37 महिलांची हत्या झाली. 7 महिलांनी अत्याचाराला कंटाळून स्वत: चा जीव दिला. याशिवाय 105 पेक्षा जास्त बलात्काराचा घटना घडल्या.

Visit : Policenama.com