धक्कादायक …! पत्नीच्या सौंदर्याच्या भीतीने तिचा चेहरा केला विद्रूप

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

खरेतर प्रत्येक पुरुषाचे स्वप्न असते की त्याची बायको सुंदर असावी. पण मुंबईतील एका इसमाने आपली बायको सुंदर आहे, तिच्यावर कोणत्याही परपुरुषाची नजर पडू नये याकरिता चक्क तिचा चेहराच विद्रुप केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित राज रायकवार हा मुंबईत राहणारा असून तो मूळचा जबलपूरचा आहे. मुंबईत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या कॅमेऱ्यांची ने – आण करण्याचं काम तो करतो. नोकरीनिमित्त तो मुंबईत राहत असून त्याची पत्नी आणि मुलं मात्र जबलपूरमध्ये राहतात. राजची पत्नी शिक्षिका असून ती शाळेत जाताना किंवा पुन्हा घरी येताना इतर पुरुषांची नजर तिच्यावर पडेल अशी भीती त्याला सतत वाटायची. आपल्या अनुपस्थित आपल्या सुंदर दिसणाऱ्या पत्नीवर परपुरुषाची नजर पडू नये, यासाठी त्याने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर वार केले. डास मारण्यासाठी वापरण्यात येणारी कॉइल ज्या लोखंडी स्डँडवर लावण्यात येते, त्या स्टँडने राजने आपल्या पत्नीच्या चेहरा ओरबाडला आणि विद्रूप केला.

ही तर विकृती
आपल्या सुंदर बायकोचा चेहरा विद्रुप करणाऱ्या राजचे हे कृत्य म्हणजे विकृतीच म्हणावी लागेल. इतकेच नव्हे तर मुंबई गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार राज याने मुंबईतही एका चिमुरडीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न त्याने केला असून त्याला पोलिसांनी अटकही केली होती. राजचे मुळगाव जबलपूरमध्ये देखील त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत.
[amazon_link asins=’B0119ROQXY,B01ETSOX6U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2eca229-ab69-11e8-b80a-f9bae5ab74e1′]