पती मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही… मला ‘संशय’, पत्नीनं केली पोलिसांकडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल मोबाईलच्या जगात अनेक तरुण तरुणी गुरफटून गेल्या आहेत. त्याचबरोबर विवाहित व्यक्ती देखील याला अपवाद नसून मोबाईलच्या पासवर्डमुळे पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर दोघांचे कौन्सिलिंग करत त्यांचा हा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलच्या पासवर्डमुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर ते दोघे तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले होते. पत्नी शिक्षिका असून पती हा औषध विक्रेता आहे. यावेळी पती आपल्यापासून अनेक गोष्टी लपवत असल्याचा आरोप पत्नीने केला. तसेच मोबाईलचा पासवर्ड देखील सांगत नाही. त्यानंतर जवळपास 3 तास त्यांचे कौन्सिलिंग करण्यात आले. पतीने यावेळी जीवनात आपल्याला गोपनीयता हवी असल्याचे म्हटले त्यामुळे आता दोघेही जण शांत झाले असून आपले वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी पतीने आपल्या मोबाईलचा पासवर्ड पत्नीला सांगण्याचे कबूल केले आहे.

पतीला न सांगता माहेरी जाता येणार नाही पत्नीला
यावेळी कौन्सिलिंग करताना सांगितल्यानुसार, पत्नीचे पतीला न सांगता सतत माहेरी जाणे हे देखील कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता यापुढे ती आपल्या पतीच्या परवानगी शिवाय सतत माहेरी जाऊ शकणार नाही. सासर आणि माहेर जवळच असल्याने ती पतीला न सांगता सतत माहेरी जात असल्याने पती त्रस्त झाला होता. तसेच पत्नीला त्रास न देण्याचे देखील त्याने लेखी दिले आहे.

Visit : Policenama.com