Pune News : ‘तुझं बाहेर कोठेतरी काही तरी चालूय’ ! चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला पेटवलं, विवाहिता गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘तुझे बाहेर कोठेतरी काही तरी चालू आहे’ असे बोलून सारखा संशय घेत पतीने विवाहितेला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

याप्रकरणी सुरेखा दत्ता कसबे (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती दत्ता खुजवे याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दत्ता यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण लग्नानंतर पती दत्ता कुसबे हा पत्नी सुरेखा यांच्यावर नेहमी संशय घ्यायचा. “तुझे बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे” असे सारखा बोलायचा. पतीच्या या संशयी वृत्ती ला कंटाळून फिर्यादीने घरातील काचेच्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेतले. तर त्याचवेळी आरोपीने माचीसची काडी पेटवून फिर्यादीचे अंगावर टाकून दिली. यात सुरेखा या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.