अोरल सेक्स साठी पतीची बळजबरी, पत्नीने घेतली कोर्टात धाव

नवी दिल्लीः वृत्तसंस्था

भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ नुसार देशात समलिंगी संबंधाना बंदी आहे. मागील काही दिवसापासून देशात समलैंगिक संबंधाच्या बातीत जोरदार चर्चा आहे. यामुळे कमल ३७७ वरील निर्णय सर्वेच्च न्यायालयाने राखून ठेवला असतानाच अनैसर्गिक शरीरसंबंधाविषयीचे एक प्रकरण कोर्टात दाखल झालं आहे. अोरल सेक्स करण्यासाठी आपल्यासोबत बळजबरी केल्यामुळे एका महिलेनं तिच्या पतीला चक्क कोर्टात खेचलं असून, पतीच्या विरोधात कलम ३७७ अंतर्गत अनैसर्गिक सेक्सचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

न्यायमूर्ती एन. व्ही . रामना आणि एम. एम. शांतनागाैदर यांच्या खंडपीठापुठे या प्रकरणावर सुनावणी झाली. पीडित महिलेचा पती तिला इच्छा नसतानाही अोरल सेक्स करण्यास भाग पाडतो. हा अनैसर्गिक सेक्सचा प्रकार आहे. असा युक्तीवाद पडित महिलेच्या वकील अपर्णा भट यांनी न्यायालयात केला आहे. याप्रकरणावरुन न्यायालयानं पीडित महिलेच्या पतीला नोटीस बजवली आहे.

[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13eadf0b-8b34-11e8-b01b-2f60bcf57d21′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित महिला अवघ्या १५ वर्षाची असताना २००२  साली तिचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर २०१४ साली तिचं लग्न झालं. पेशाने डाॅक्टर असलेला पती तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अोरल सेक्स करण्यास भाग पाडतो, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी तिनं पतीवर बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्सचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. वैवाहिक बलात्कारासंबंधी कलम ३७५ अंतर्गत कसलीही तरतूद नसल्याचं गुजरात हायकोर्टानं स्पष्ट केलं होतं. तसंच, कलम ३७७ अंतर्गत महिलेने केलेले आरोपही फेटाळून लावले होते. त्यानंतर तिनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
तर कलम ३७७ मधील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सर्वेच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठानं राखून ठेवला आहे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सहमतीने होणारा सेक्स, अॅनस सेक्सला अनैसर्गिक संबंधाशी जोडता येणार नसल्याचे, न्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी याआधीच्या सुनावणीच्या वेळी म्हटलं होते. हा संपूर्ण वाद सुरू असतानाच अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी ३७७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी झाल्यामुळे प्रकरणाचा गुंता वाढण्याची दाट शक्यता आहे.