नराधम पतीचे मित्रासोबत आपल्याच अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य !

पोलिसनामा ऑनलाईन – नराधम पतीने मित्रासोबत अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याची धक्कादायक जळगाव शहरात घडली आहे. पिंप्राळा भागातील प्रल्हाद नगरात घटना घडली असून पती व त्याच्या मित्राविरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला, तिचा पती व तीन मुले जून महिन्यांपासून आरोपी मित्राच्या घरात भाड्याने राहात होते. आरोपी एकटाच राहात असल्यामुळे पती स्वतःच्या पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होता. मात्र, तसं करण्यास पीडितेचा विरोध होता. पती वाद घालून पत्नीला मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होता.त्यानंतर त्याने कोल्ड्रिक्स पाजून पत्नीला बेशुद्ध केले.

त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. पतीच्या मित्राने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केला.याबाबत वाच्यता केल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. त्यानंतर त्याने पत्नीला माहेरी पाठवून दिले. पीडितेने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर थेट पोलिस स्टेशन गाठून पीडितेने पोलिसांना माहिती दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like