गर्भवती पत्नीने पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा संशय, पतीची पोलिसात धाव 

बेंगळुरू : वृत्तसंस्था – इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साईट्सचा जितका चांगला उपयोग केला जातो तितकाच वाईट गोष्टी पसरवण्याकरिता देखील सोशल माध्यमांचा वापर वाढत आहे. त्यातही सोशल नेटवर्किंग माध्यमाद्वारे पॉर्न व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. पण या पॉर्न व्हिडीओज मुळे भल्याभल्यांचे संसार उध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना बंगळूर येथे घडली आहे. आपल्या गर्भवती पत्नीने पॉर्न फिल्म मध्ये काम केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. विशेष म्हणजे त्याची पत्नी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. पण त्यांचे नाते आता तुटण्याच्या मार्गावर आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बंगळूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन होते. हा व्यक्ती एका ई-कॉमर्स पोर्टलसाठी डिलीव्हरी बॉयचे काम करत होता. एक व्हिडिओत त्याला आपल्या पत्नीसारखी महिला दिसली. त्यामुळे आपल्या पत्नीवर त्याला संशय आला त्याने गर्भवती पत्नीला याबाबत विचारले. तेव्हा तिने सरळ नकार दिला. तेव्हा त्याने तिला प्रचंड मारहाण केली. महिनाभर अत्यंत वाईट वागणूक दिली. अखेर तो तिला पोलिसांकडे घेऊन गेला आणि त्याने तक्रार दाखल केली.

पत्नी होती निर्दोष
पोलिसांनी तपास केला असता तो व्हिडिओ भारतातला नसून परदेशातला असल्याची बाब स्पष्ट झाली. त्याचप्रमाणे त्या चित्रफितीतील नायिका ही त्याची पत्नी नसल्याचं स्पष्ट झालं.यानंतर चिडून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. तर पोलीस त्याला मानसोपचारतज्ञाकडे घेऊन गेले आहेत. पॉर्नच्या व्यसनामुळे त्याच्या मेंदुवर परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

सोशल मीडिया आणि काय घ्याल खबरदारी
कुणालाही अश्लील क्लिप्स, फोटो, जोक्स, मेसेज पाठवले आणि त्या संबंधित व्यक्तीनं त्यावर आक्षेप घेत जर पोलिसांत तक्रार केली तर पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी तक्रार मुलीनं केली तर सायबर कायद्याप्रमाणेच नव्हे तर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि त्यानुसार न्यायालयात होणारी शिक्षा ही गंभीर असते.

यापुढचा टप्पा अधिक कठोर शिक्षांचा असतो. एकदा का गुन्हेगारी रेकॉर्ड निर्माण झालं तर साधा पासपोर्ट काढून परदेशी, शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणंही अशक्य व्हावं. कारण असं गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्यांस पासपोर्ट मिळणंही अवघड असतं.

१) सोशल मीडिया ही अत्यंत गांभीर्यानं वापरण्याची गोष्ट आहे. तिथं आपल्या व्यक्तिगत आयुष्यातले संदर्भ, फोटो, व्हिडीओ शेअर करताना काळजी घ्यावी. आपल्या पोस्ट ‘पब्लिक’ असू नयेत.

२) गंमत म्हणून, सहज म्हणून कधीही कुणाही अनोळखी व्यक्तीला नको ते मेसेज, लिंक्स पाठवू नये.

३) ओळखीच्या मुलींना, मैत्रिणींनाही अश्लील वाटेल असे मेसेज, फोटो पाठवू नयेत. त्यांनी तक्रार केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

४) मित्रमैत्रिणींचा कॉमन ग्रुप असला आणि सगळे ‘चलता है’ म्हणत असले, त्यांना चालत असलं तरी आपण कुणाचेही खासगी फोटो काढणे, ते शेअर करणे, व्हायरल करणे असे उद्योग करू नयेत. त्यासंदर्भातही शिक्षा होऊ शकते.

५) विनयभंग, ब्लॅकमेलिंग, फसवणूक असे गुन्हे दाखल होऊन कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

६) आभासी ओळखीला प्रत्यक्षातली ओळख समजून त्यावर विश्वास ठेवू नये.