धक्‍कादायक ! प्रसुती झालेल्या पत्नीला ‘त्यानं’ खाद्यांवर घेवून केला प्रवास

भोर : पोलीसनामा वृत्तसंस्था – भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नेहमीच विकासाच्या गप्पा करत असते. मात्र अस्तित्वात चित्र काही वेगळच दिसत आहेत. पुण्यातील काही गावांमध्ये साध्या पायाभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. पऱ्हर बुद्रुक ता. भोर येथील धानवली वस्तीत एका घटनेमुळे हा प्रत्यय आला आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे तेथील गावात वाहनांचा प्रवेश होऊ शकत नाही. अनेकदा मागणी करूनही सरकार या वस्ती वाड्याकंडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे.

धानवली वस्तीती सुविधांच्या अभावामुळे एका तरूणाला प्रसूती झालेल्या पत्नीला घरी आणण्यासाठी चक्क खांद्यावर उचलून आणावे लागले आहे. गावात वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने या तरूणाना तब्बल साडेतीन किलोमिटरची पायपीट करण्याची वेळ आली.

या वस्तीतील लोकांना अनेकदा सुविधांची मागणी केली. निवडणुकांवर बहिष्कार टाकला. तरीही सरकारला जाग आली नाही. एवढे करूनही धानवली वस्तीचा रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. पऱ्हर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत ४०० लोकसंख्या आहे. भोरपासून सुमारे ३५ किलोमीटरवर असलेल्या कंकवाडीपर्यंत वाहनांची सोय आहे. परंतू तेथून पुढे पऱ्हर वस्तीत जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर अंतर चालत जावे लागते. आजारी व्यक्तींना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी अनेक अडचणी येतात.

सरकारच्या या दुर्लक्षामुळे तेथील नागरिक संतप्त झाले आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या ठाकरबप्पा योजनेअंतर्गत रस्त्यासाठी व इतर विकासकामांसाठी तेथील स्थानिक पुढाऱ्यांकडे वेळोवेळी निधीची मागणी तेथील नागरिकांनी केली होती. परंतु त्यांना निधी देण्यात आला नाही. त्यानंतर पुढारी असे ऐकत नाही म्हटल्यावर या गावाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कारही टाकला तरीही याचा ग्रामस्थांना काही उपयोग झाला नाही.

दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांच्या निधीतून या साडेतीन किलोमीटर रस्त्यापैकी दीड किलोमीटरचा रस्ता खडी टाकून करण्यात आला होता. मात्र एका मुसळधार पावसात या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तर उरलेल्या रस्त्यावर काहीच काम करण्यात आलेले नाही. थोपटे यांच्या प्रयत्नांतून गावाला आता वीजपुरवठा करण्याचे काम महावितरणाकडून सुरू आहे.
आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या