धक्कादायक ! बायकोपासून पिच्छा सोडवण्यासाठी जवानानं दिली 5 लाखाची सुपारी

पोलिसनामा ऑनलाईन – १४ जानेवारीला सुसनेर पोलीस स्टेशन क्षेत्रातील गाव पालडाजवळ जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतहेद आढळून आला. या महिलेच्या शरीरावर कपडे नव्हते आणि तोंडावर जखमेचे निशाण होते. पोस्टमार्टेमधून समोर आलं की, महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली. पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना मध्यप्रदेश येथे घडली आहे. इथे एका सैनिक पतीने त्याच्या पत्नीची सुपारी देऊन हत्या केली. पोलिसांनी ७ दिवसात या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश केलाय.

महिलेची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं. आगर-मावला एसपीने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत महिलेचे पोस्टर सगळीकडे लावले आणि गावागावांमध्ये महिलेबाबत विचारपूस केली. यादरम्यान समोर आले की, महिला पगारिया गावातील आहे. नंतर पोलिसांनी गावात पोहोचून महिला राहत असलेल्या घराच्या मालकाची चौकशी केली. त्यातून समोर आले की, तिचा पती अर्जुन सैनिक आहे. काही इतर लोक तिला २ हजार रूपये महिन्याचं घर भाड्याने देऊन गेलेत. महिलेचं नाव कामाक्षी असून ती मूळची छिंदवाडा येथील आहे. छिंदवाडा जाऊन मृत महिलेच्या परिवारातील लोकांना दफन केलेल्या शवाची ओळख पटवण्यास सांगितली. कामाक्षीच्या भावाने सांगितले की, अर्जुनने लग्नाचं आमीष दाखवत बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. ज्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यामुळे इच्छा नसतानाही अर्जुनने कामाक्षीसोबत आर्य मंदिरात लग्न केलं होतं.

एसपी राकेश शर्मा यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, पतीने ५ लाख देऊन आपल्या पत्नीची हत्या करून घेतली. ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या हत्येचा मास्टरमाइंड कामाक्षीचा पती अर्जुन याचा शोध घेणं सुरू आहे. दरम्यान, अर्जुनने आपले संबंध लपवण्यासाठी आणि पत्नीचा खात्मा करण्यासाठी ३ लोकांना ५ लाख रूपये दिले होते. तिन्ही आरोपींनी कामाक्षीला सांगितले की, तिच्या पतीने तिला आगर-मालवा येथे बोलवलं आहे. तिला कारमध्ये बसवून घेऊन गेले. रस्त्यात सेमली हरनावदाच्या जंगलात तिची गळा दाबून त्यांनी हत्या केली. तिचा मृतदेह पालडा जंगलात नेऊन फेकला.