बलात्काराच्या आरोपाखाली पती जेलमध्ये, जामिनासाठी पत्नीचा पोलिसांवर दबाव, स्टेशनसमोरच डिझेल अंगावर टाकून आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या पतीच्या जामिनासाठी पोलिसांवर दबाव आणत पत्नीनेच पोलीस ठाण्यात राडा घातल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तिने ठाण्यासमोर अंगावर डिझेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी महिला शिपाई प्रमिला पवार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २९ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगावर डिझेल ओतून घेउन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेच्या पतीविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला जामीन होण्यासाठी संबंधित महिलेने येरवडा पोलिसांकडे मागणी केली होती. तसेच जामीन व्हावा अश्या पध्दतीने अहवाल न्यायालयात द्यावा यासाठी तिने हा राडा घातला. त्यासाठी तिने सोबत आणलेले बाटलीतील डिझेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. अधिक तपास सहायक निरीक्षक एस. बी. बनसोडे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like