पत्नीसोबत त्याचं ‘झेंगाट’ असल्याचा होता ‘संशय’, पतीनं सपासप वार करून ‘संपवलं’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहितेच्या पतीनं तिच्या प्रियकराला अनैतिक संबंधाच्या संशयावरून सपासप वार करून ठार केलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. नरपत सिंह गावीत अंस मृत व्यक्तीचं नाव आहे. पाथर्डी गावातील गौळाणे रस्त्यावरील तो रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विठ्ठल गव्हाणे यानं नरपत सिंह गावितचा कोयत्यानं सपासप वार करू खून केला. आज सकाळी ही घटना घडली. नरपत सिंह आणि विठ्ठल हे दोघंही एकमेकांच्या शेजारी राहतात. 15 दिवसांपूर्वीच दोघांमध्ये भांडण झाल्यानं घरमालकानं विठ्ठलला घर खाली करण्यास सांगितलं होतं. विठ्ठलनंही घर खाली केलं होतं. आज सकाळी (शुक्रवारी दि 6 डिसेंबर) साडे आठच्या सुमारास नरपत सिंह गावित कंपनीत जाण्यासाठी निघाला होता. यावेळी गौळाणे रस्त्यावर असताना विठ्ठल यानं त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर कोयत्यानं सपासप वार केले. यावेळी नरपतच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

या घटनेची माहिती मिळताना पोलीस ताबडतोब घटनास्थळी हजर झाले. यावेळी नरपतला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच सुमारे साडेदहा वाजता नरपतचा मृत्यू झाला. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचं समजत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान, सागर पाटील या पोलिसांनी नरपतला रुग्णालयात दाखल केलं होतं.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like