पत्नीच्या डोक्यात बॅट घालून केला खून, स्वत:च केला पोलिसांना फोन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पत्नीची डोक्यात बॅट घालून खून केल्यानंतर नवर्‍याने स्वत: पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही घटना हरियाणातील रेवाडी नागलिया रनमोख गावात घडली. घडली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर गच्चीवर त्यांना महिलेचा मृतदेह आढळला.

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी वीरपालने रोहडाई पोलिसांना फोन करून, मी पत्नीच्या डोक्यात बॅट घालून तिचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्यावेळाने वीरपाल स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरपाल पत्नीवर कायम संशय घेत होता. त्याची मानसिक स्थितीही ठिक नव्हती. दोघांमध्ये काल भांडण झाले, याच रागात आज पहाटे घरात असलेल्या बॅटने त्याने पत्नीचा खून केला. पळून जाण्याऐवजी आरोपीने स्वत: पल्हावस पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवला आहे.