पतीने केली पत्नीची हत्या, भासवली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – व्यसनातून माणूस कधी काय करेल सांगता येत नाही. त्यात दारुच्या व्यसनाने तर लाखो घरे उजाड झाली आहेत. दारुचे व्यसन आणि रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याची अशीच एक घटना गोरेगावात मंगळवारी (ता. २०) घडली आहे.  मुलाची शाळेची फी भरण्यासाठी पतीकडे पैसे मागितल्याने त्याने पत्नीची हत्या केली आहे.

गोरेगावातील उन्नतनगरमध्ये पूजा गौडा (वय ३६) ही महिला पती नीरज आणि मुलासह राहत होती. नीरजला दारुचे व्यसनही होते. दारुमुळे तो घरखर्चासाठी पैसेही देत नव्हता. त्यावरुन त्यांचे नेहमीच भांडण होत असे. मंगळवारी तो घरी दारु पिऊन आल्यावर पत्नीने त्याला मुलाची फी भरण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी चिडून त्याने तिचा गळा आवळला. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

विशेष बाब म्हणजेपोलीसांना संशय येऊ नये म्हणून त्याने तिचा मृतदेह घराच्या छताला लटकवला. जेणेकरुन पोलीसांना ती आत्महत्या वाटेल. मुलगा घरी आला तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी पुजाचा मृतदेह रुग्णालयात नेला. मात्र त्यापुर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदन आहवालात तिचा गळा आवळून खून झाल्याचे उघड झाले आहे. पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like