पुणे : आजारी पत्नीचा पतीने केला खून, पतीला अटक

शिरूर :  पोलीसनामा ऑनलाईन

चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार भांडण करणाऱ्या आजारी पत्नीचा पतीने ओढणीने गळा आवळून खून केला.  ही घटना शरुर शहराच्या कुंभार आळीत आज (मंगळवार) सकाळी घडली. पत्नीचा खून करुन पती स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.
लता संदीपान सोळुंके (वय 32, रा. कुंभार आळी, शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे बंधू पांडुरंग श्‍यामराव कदम (रा. मुंबई बाजार, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत लता हिचा पती संदीपान प्रभाकर सोळुंके याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दुपारी त्याला अटक केली.

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’272076d4-b5bf-11e8-8baa-1d49bf2fd101′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे भेंड टाकळी (ता. गेवराई, जि. बीड) येथील सोळुंके कुटुंबीय शिरूरच्या कुंभार आळी येथे दोन वर्षांपासून वास्तव्यास होते. संदीपान सोळुंके हा रांजणगाव एमआयडीसीत खासगी कंपनीत कामाला होता. पत्नी लता यांना संधिवाताचा त्रास होता. पतीचे बाहेर संबंध आहेत, असा संशय पत्नीला होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. रविवारी (ता. 9) रात्रीही याच कारणावरून त्यांच्यात भांडणे झाले. त्यामुळे संदीपान याने पत्नीला मारहाण केली होती. त्यानंतर आज सकाळी कंपनीत कामाला जायचे असल्याने ते पहाटे चार वाजताच उठले. परंतु, त्यांचा डबा बनविण्यासाठी व इतर आवराआवरी करण्यासाठी पत्नी लता या आवाज देऊनही उठल्या नाहीत. त्यामुळे संदीपान याने रागाच्या भरात पत्नी लता यांचा झोपेतच ओढणीने गळा आवळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31d7898a-b5bf-11e8-8841-056cd9a4417b’]

मृत लता यांचा भाऊ पांडुरंग कदम हा देखील जवळच राहात आहे. या प्रकारानंतर संदीपान स्वतः त्यांच्या घरी गेला व पांडुरंग याच्या पत्नीला स्वतःच्या घरी घेऊन आला व घडलेली हकिगत सांगितली आणि पोलिस स्टेशनला गेला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस निरीक्षक कैलास घोडके पुढील तपास करीत आहेत.

महिलांसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या