Pune : विवाहानंतर तिसर्‍याच महिन्यात त्यानं पत्नीला संपवलं, रात्रभर ‘डेडबॉडी’च्या शेजारी बसून होता पती, पहाटे झालं असं काही…

 देहू : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री देहू येथे घडली. पूजा वैभव लांबकाणे (Pooja Lambkane) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी पती वैभव लांबकाणे याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, वैभव आणि पूजा Pooja Lambkane यांचा तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. वैभवच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. विवाहानंतर दोघांमध्ये शुल्लक कारणावरून खटके उडू लागले. वैभव हा पूजाचा Pooja Lambkane मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. दिवस जात होते तसे दोघांमध्ये किरकोळ कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणे ही होऊ लागली. गुरुवारी संध्याकाळी असेच जोरदार दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान मध्यरात्री पूजा झोपेत असताना वैभवने तिचा गळा आवळून खून केला. वैभव रात्रभर तिच्या मृतदेहाच्या बाजूलाच बसून राहिला त्यानंतर सकाळी त्याने पूजाच्या नातेवाईकांना पूजाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. यानंतर नातेवाईकांन तात्काळ पूजाच्या घरी दाखल झाले असता बिछाण्यातच तिचा मृतदेह त्यांना आढळून आला. नातेवाईकांनी घटनेबाबत देहूरोड पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे वाटले त्यांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच कौटुंबिक कलहातून वाद झाल्याने पूजाचा गळा आवळून मारल्याची कबुली त्याने दिली.दरम्यान मावळ तालुक्यातील आठवड्याभरात हि दुसरी घटना आहे. यापूर्वी तळेगाव येथील२२ वर्षीय सुनेने कौटुंबिक वादातून कापडी ब्लाउजने आपल्या सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती.

Also Read This : 

 

चंद्रपूरातील दारुबंदी ‘उठविली’ अन् नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील मद्यमाफियांचा ‘बाजार’ उठला !

 

जमिनीवर बसून जेवणाचे ‘हे’ ४ फायदे, जाणून घ्या

 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय